पोस्ट्स

मेतकूट

मेतकूट साहित्य १.  हरभऱ्याची डाळ ३/४ पेला २. तांदूळ-१/२ पेला ३.उडीद डाळ-१/४ पेला ४. गहू मूठभर ५. तूर डाळ मूठभर ६. लवंगा १५-२० ७. हळकुंड ३ ८. सुठकुडी १ ९. हिंग - १ मोठा चमचा १०. जिरे - ३ मोठे चमचे ११.धने- ५-६ मोठे चमचे १२. मोहरी एक मूठ १३.वेलदोडे-१२-१५ (बाकी रुचिरामधे दिलेले पदार्थ ऐच्छिक)  १. दोन तीन सुक्या मिरच्या २. अर्धे जायफळ कृती १. हिंग, सुंठ, वेलदोडे आणि जायफळ वगळता, इतर पदार्थ निरनिराळे कोरडे खमंग भाजून घ्यावेत. २. हे सर्व पदार्थ एकत्र करून बारीक दळावेत. ३. त्यामधे हिंग, सुंठपूड, वेलदोड्याची पूड आणि जायफळाची पूड घालून एकत्र करावे. 

वरईचे सांदण

इमेज
वरईचे सांदण साहित्य १०० ग्रॅम वरईचे तांदूळ (एक छोटी वाटी)  ७५ ग्रॅम साखर (पाऊण वाटी)  १/२ वाटी दही १/२ वाटी दूध १/२ वाटी तूप/लोणी४  २ पिकलेली केळी १ चमचा बेकिंग पावडर  १/४ चमचा बेकिंग सोडा १/४ चमचा जायफळाची पूड चिमूटभर मीठ कृती १. वरईचे तांदूळ मिक्सरवरून बारीक करून घ्यावेत.  २. वरईच्या तांदळच्या  पिठामधे इतर सर्व पदार्थ मिळावेत.   ३.एका डब्याला तूप लावून आणि खाली बटरपेपर घालून डबा तयार करून घ्यावा.  ४. तयार केलेल्या डब्यांमधे हे मिश्रण ओतावे.  ५. डबा कुकरमधे अथवा स्टीमरमधे ठेऊन पुडिंग २०-२५ मिनिटे वाफवून घ्यावे. 

ज्वारीच्या पिठाचा खाकरा

इमेज
साहित्य:- १. ज्वारीचे पीठ १ वाटी २. पाणी पाऊण वाटी  ३.मीठ ४. कसुरी मेथी ५. हळद ६. तिळ कृती १. पाऊण वाटी पाणी उकळायला ठेवले. त्यात मीठ, हळद, मसाले, कसुरी मेथी आणि थोडे तीळ घातले.  २. उकळत्या पाण्यात ज्वारीचे एक वाटी पीठ घालून घोटले. लगेच गॅस बंद करून पीठ खूप छान मळून घेतले ३. पिठाचा गोळा पातळ लाटला आणि एका झाकणाने सारख्या आकाराचे खाकरे कापून घेतले ४. खाकरे तव्यावर हलके भाजून घेऊन बाजूला काढले.  ५. त्यानंतर ब्रश प्रत्येक खाकऱ्याला हलके तेल लावून घेतले. ६. तेल लावलेले काही खाकरे पुन्हा गरम तव्यावर दाबून शेकले. काही मायक्रोवेव्हमधे २ मिनिटे ठेवून भाजले.

बिनअंड्याचा लुसलुशीत केक!

इमेज
  साहित्य:- १. मैदा:-३३० ग्रॅम (२.५ कप)  २. साखर:- ३०० ग्रॅम(१.५ कप)   ३.बेकिंग पावडर :- २.५ चहाचा चमचा ४. बेकिंग सोडा:- १/२ चहाचा चमचा ५. मीठ:- १/२ चहाचा चमचा ६. दही:- ३/४ कप(१७५ते  १८५ मिली )  ७. तेल :- १/२ कप (१२० मिली)  ८. लोणी:- १/४ कप (५० मिली)  ९. दूध:- २०० ते २५० मिली ( ३/४ ते १ कप)  १०. व्हॅनिला इसेन्स :-१ चहाचा चमचा कृती:- १. केकचा डबा आतून तेल लावून व पीठ भुरभुरवून अथवा खाल बटरपेपर लावून तयार ठेवावा. ओव्हन १६०°सेंटीग्रेडला १० मिनिटे तापवत ठेवावा.  २. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व मीठ एकत्र करून घ्यावे.  ३. तेल, लोणी, दही, साखर व व्हॅनिला इसेन्स एकत्र करून चांगले फेटावे.  ४. वरील मिश्रणात मैद्याचे मिश्रण हळूहळू घालून ते सगळे एका दिशेने फिरवत एकत्र करावे. या मिश्रणात अंदाजे १ कप दूध घालून एकत्र करावे व तयार केलेल्या केकच्या डब्यात ते ओतावे.   ५. केकचा डबा गरम ओव्हनमधे १६०° सेंटीग्रेडला ठेवून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे केक भाजून घ्यावा.  तळटीप:- १. लोण्याचे आणि तेलाचे प्रमाण कमी जास्त करता येते. उन्हाळ्यात लोणी ...

ह्म्मस टिक्की

इमेज
साहित्य:- १. उकडलेले छोले १ वाटी  २. ताहिनी १ चमचा ३. मीठ १/४ चमचा ४. लसूण, मिरची, कोथिंबीर यांचे वाटण १/२ चमचा ५. चिली फ्लेक्स,  ६. ऑलीव्ह ऑईल :-  १ चमचा ७. लिंबाचा रस १/२ चमचा ८. बेसन/मसूर डाळीचे पीठ/रवा/तांदळचे  पीठ अंदाजे पाव चमचा ९. गरम मसाला:- १/२ चमचा १०. बेकिंग पावडर १/८ चमचा कृती:- उकडलेले छोले मिक्सरवर अथवा ठेचून घेऊन बारीक करून घ्यावेत. त्यात ईतर  सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्यावे. त्या पिठाच्या छोट्या टिक्क्या करून त्यांना वरून थोडे तेल लावावे /स्प्रे करावे. एयरफ्रायर मधे ठेवून टिक्क्या १८०° सेंटिग्रेडला २० मिनिटे भाजून घ्याव्यात. 

ज्वारी आणि मसुराच्या पिठाचा ब्रेड

इमेज
ज्वारी आणि मसुराच्या पिठाचा ब्रेड साहित्य:- १. ज्वारीचे पीठ :- १ वाटी (~ १५० ग्रॅम) २. मसूराचे पीठ:- १/४ वाटी (~५० ग्रॅम्स) ३. मीठ-मसाला :- चिली फ्लेक्स, मिक्स्ड इटालियन हर्बस्, लसूणपूड, काळी मिरी पूड, मीठ.. अंदाजे दोन चमचे ४. चिया सीडस् आणि जवस:प्रत्येकी १/२ चमचा, मिक्सरवर जाडसर पूड करून. ५. इसबगोल:- दोन चहाचे चमचे ६. इन्स्टंट यीस्ट:- १/२ चहाचा चमचा ७. पीठ भिजवण्यासाठी दूध ८. ऑलिव्ह ऑईल :-.२ चहाचे चमचे ९. साखर:- १ चमचा कृती:- १. दोन्ही पिठे, मीठ-मसाला, सीड्स, साखर व यीस्ट व इसबगोल एकत्र करून कोमट दुधामधे  भिजवून व मळून तासभर झाकून ठेवले. २. तासाभराने फुललेले पीठ परत मळून घेतले व वरून ऑलिव्ह ऑईल लावून परत अर्धा तास झाकून ठेवले. ३. केक टिनला आतून तेल लावून घेतले.   ४. पिठाचा गोळा टिनमधे घालून पुन्हा झाकून अर्धा तास ठेवून दिला.  ५. एयर फ्रायरमधे १८०°ला २० मिनिटे ब्रेड भाजून घेतला.  क्रिमी डिप:- १. चीझ क्यूब १ २. काजू :- ७-८ ३. हिरवी मिरची:-१ ४. कोथिंबीर :- पाववाटी.  ५. दही:- १/२ वाटी ६. लसूण पूड १/४ चमचा ७. मीठ:- १/४ चमचा ८. साखर:-१/४ चमचा वरील सगळे पद...

छोले क्रॅकर्स

इमेज
साहित्य:- १. उकडलेले छोले १ कप २. मसुराचे पीठ १/२ कप ३. Olive oil २ चहाचे चमचे ४. चिया सीडस् २ चहाचे चमचे ५. कलौंजी २ चहाचे चमचे ६. लाल तिखट १ चहाचा चमचा ७. लसूण पूड १ चहाचा चमचा ८. हळद १/४ चहाचा चमचा ९. मीठ १/२ चहाचा चमचा १०. बेकिंग पावडर १/४ चहाचा चमचा  कृती:- १. उकडलेले छोले मिक्सरवर वाटून घ्या.  त्यामधे वरील सर्व पदार्थ घालून गोळा १५-२० मिनिटे भिजवून ठेवा.  २. बटरपेपरला थोडे तेल लावून त्यावर हा गोळा ठेवा. गोळा हाताने दाबून पातळ करा.  ३. ट्रे ओव्हनमधे ठेवून, १८०°फॅरनहाइटवर २०-२५ क्रॅकर्स भाजून घ्या. एखाद्या क्रिमी डिप मधे बुडवून खा!

शेपूची फळं!

इमेज
सोलापूरच्या माझ्या बाल मैत्रिणीने , डॉक्टर सुनीता सुर्डी (पूर्वाश्रमीची नान्नजकर) हिने संगितलेला, करायला अगदी सोपा, रुचकर आणि आरोग्यदायी असा,  'शेपूची फळे'  हा  पदार्थ, मी आज करून बघितला. त्याची पाककृती आज सांगते.  साहित्य:- ज्वारीचे पीठ  मीठ  लसूण  शेपूची पेंडी फोडणीसाठीचे साहित्य   कृती  ज्वारीच्या पिठात मीठ व थोडा लसूण कांडून घालावा. पीठ घट्ट मळून घेऊन त्याचे छोटे गोल व चपटे गोळे बनवून घ्यावे. शेपू स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. चाळणीला तेल लावून त्यावर १ थर गोळे ठेवून त्यावर शेपूचा थर घालावा. हि चलनी उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ठेऊन या गोळ्यांना चांगली दणदणून वाफ काढून घ्यावी. नंतर थोडी फोडणी घालून तसेच खावे किंवा परतून घेतले तरी चालते. शेपूच्या ऐवजी इतरही पालेभाज्या घालता येतात. आज मी मेथी घालून फळे केली होती. सुनीताने सांगितल्याप्रमाणे फोडणीत मोहरी, हिंग, हळद अशी फोडणी केलीच होती. पण त्या फोडणीत थोडेसे तीळ घातल्यामुळे अजूनच चवदार लागली.    डायटींग वगैरेचा विचार न करता, लोखंडी तव्याव...

ग्रीक योगर्ट क्रॅकर्स!

इमेज
साहित्य:- १. मैदा १०० ग्रॅम  २. चक्का:- १०० ग्रॅम ३. मीठ चवीनुसार  ४. मसाले:- जिरे, ओवा, काळीमिरी, इटालियन हर्बस्, रोजमेरी, कलौंजी,लसूणपूड,लाल/हिरवी मिरची... आवडीनुसार घालावेत.  कृती :- १. मैदा व चक्का, चवीपुरते मीठ व  आवडीनुसार मसाले एकत्र करून मळून घ्यावे. पीठाचा गोळा घट्ट असला पाहिजे. त्यासाठी मैदा व चक्क्याचे प्रमाण कमी जास्त करून घट्ट गोळा मळून घ्यावा.  २. या गोळ्याच्या पातळ पोळ्या लाटून त्या पोळीला वरून जरा टोचे मारावेत. पोळीचे हव्या त्या आकाराचे तुकडे कापून घ्यावेत.  ३. ओव्हन १८० डिग्री फॅरनहाइईटला पाच मिनिटे गरम करून घ्यावा.  ४. गरम ओव्हनमधे क्रॅकर्स  अंदाजे १० मिनिटे भाजून घ्याव्यात.  ५. बाहेर काढून वर हवे ते टॉपिंग घालून खाव्यात. मी चीझ आणि चिली सॉस घालून केल्या होत्या. 

कणीक घालून केलेल्या, अंडेविरहित केळ्याच्या कुकीज्

इमेज
साहित्य:- १. पिकलेली केळी :- २ ते तीन २. लोणी:- २०० ग्रॅम ३.साखर:- १५० ते  १७५ ग्रॅम ४. कणीक:- २०० ग्रॅम ५. बेकिंग पावडर :- चहाचा १ चमचा ६. दालचिनी पूड:- चहाचा १ चमचा ७. जायफळाची पूड:- चहाचा अर्धा चमचा ८.  सुंठपूड:- चहाचा अर्धा चमचा ९. मीठ:- चहाचा अर्धा चमचा १०. बदामाचे तुकडे:- अर्धा वटी ऐच्छिक  कृती:- १. लोणी व साखर फेटून घेतले.  २. केळी सोलून घेऊन त्याचा लगदा करून घेतला. तो लगदा लोणी व साखरेत मिसळला.  ३. कणीक, मीठ, बेकिंग पावडर, दालचिनी पूड, जायफळपूड, सुंठ असे सगळे कोरडे पदार्थ एकत्र करून घेतले.  ४. कोरड्या पदार्थांचे मिश्रण थोडे थोडे करत केळी+लोणी+साखरेच्या मिश्रणात घालून, कणीक मळून घेतली.  ५. ओव्हन पाच-सात मिनिटे १८०सेंटिग्रेडवर गरम करून घेतला.  ६. बिस्कीटाच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते ट्रेनमधे घालून साधारण ३० मिनिटे भाजून घेतले.  तळटीप:- १.साखर आपल्या आवडीनुसार व केळ्याच्या गोडीचा अंदाज घेऊन कमी-जास्त करण्यास हरकत नाही. २. स्वादासाठी वेलदोडा, कॉफी, कोको असे इतर पदार्थ वापरता येतील.  ३. बदामाचे ऐवजी काजूचे तीकडे, ...

अनसुयाबाईंचा मसालेभात

सोलापूरला माझ्या माहेरी, अनसुयाबाईं चितापूरकर नावाच्या एक बाई सणावाराला स्वयंपाक करायला यायच्या. त्यांच्या हातचे बरेच पदार्थ उत्कृष्ट असत. त्यांचा नवरा आचारी होता. त्यामुळे  इतरवेळी त्या लग्नाचा स्वयंपाक करायच्या. त्यांच्या हातचा मसालेभात अगदी खास असायचा.  अनसुयाबाईंचे मसालेभाताचा प्रमाण:-.  साहित्य - धने :- १ वाटी साधे जिरे:-१/४ वाटी दालचिनी:- ५-६ काड्या लवंगा:-१०-१२ शहाजिरे:-१ चमचा कृति:- धने कोरडे, हलके भाजून घ्यावेत. धने भाजून होत आले की त्यात साधे जिरे घालून अगदी थोडावेळ धने-जिरे एकत्र भाजावेत. त्यानंतर गॅस बंद करून त्यात लवंगा, शहाजिरे व दालचिनी घालून, सगळे मिश्रण थंड करावे.  थंड झालेले मसाल्याची बारीक पूड करून घ्यावी.  १ वाटी तांदूळासाठी वरील मसाला २ चहाचे चमचे भरून घालावा.  तांदूळ धुवून फडक्यावर निथळून ठेवावेत. तेलाची फोडणी करून त्यात तमालपत्र, आवडीप्रमाणे हिरवी/लाल मिरची घालावे. निथळलेला तांदूळ फोडणीमधे चांगला परतून घ्यावा. तांदळाच्या दुप्पट आधण घालून, त्यात मीठ, तयार केलेला मसाला घालून, झाकण ठेवून भात वाफवून घ्यावा.  मसालेभात वाढताना त्यावर भ...

गुजिया

इमेज
साहित्य:-  पारीसाठी:- मैदा  १ कप तूप पाव  वाटी मीठ चिमूटभर पाणी सारणासाठी:- खवा पाव किलो रवा पाववाटी  पिठी साखर दीड वाटी सुळे खोबरे कीस १ वाटी खसखस चार चहाचेर चमचे बडीशोप १ चहाचा चमचा बदाम काप पाव वाटी वेलदोड्याची पुड १ चमचा कृती :- पारी:- मैद्याला तूप लावून घ्यावे. साधारण मूठ वळेल इतपत तूप घालावे. मैद्यात चिमूटभर मीठही घालावे. पाणी घालून मैदा घट्ट भिजवून ठेवावा. सारण:- खसखस व बडिशोप भाजून घेऊन पूड करून घ्यावी. खवा हलका परतून घ्यावा बदामाचे काप तुपावर परतून घ्यावेत रवा तुपावर भाजून खाव्यावर घालून ठेवावा त्यात साखर, सुके खोबरे, खसखस व बडिशोपेची पूड, वेलदोड्याची पूड घालून एकत्र करावे. मैद्याची जाडसर पारी वाटून त्यात सारण भरावे.  गुजियांना मुरड घालून बंद कराव्यात. मंद आचेवर तेलामधे तळून घ्याव्यात. 

गोळ्याचे सांबर

इमेज
चण्याच्या डाळीचे किंवा बेसनाचे अनेक पदार्थ आपण घरी करतो. परवा सहज बोलता बोलता माझ्या वडिलांना गोळ्याच्या सांबाराची आठवण झाली.  त्यानंतर त्यांनी त्यांच्या लहानपणीची आठवण मला सांगितली.   त्यांच्या लहानपणी, त्यांच्या घरामधे स्वयंपाकाला येणाऱ्या गंगुबाई नावाच्या  स्वयंपाकीण बाईंचे माझे वडील विशेष लाडके होते म्हणे. गंगुबाईंनी गोळ्याचे सांबर केले की त्या खास माझ्या वडिलांसाठी, सांबारात एकच गोळा मोठय़ा आकाराचा करायच्या आणि वडिलांना अगदी प्रेमाने तो वाढायच्या. लहानपणी इतक्या छोट्या गोष्टीचेही किती अप्रूप असते नाही? वडिलांनी आज त्यांच्या वयाच्या नव्वदीतही ती खास आठवण मनांत कुठेतरी जपून ठेवलेली आहे.  बरेच दिवसांत मी गोळ्याचे सांबर केले नव्हतेच. वडिलांनी आठवण करून दिली म्हणून मीही गोळ्याचे सांबर करायचे ठरवले. माझ्या आजीने सांगितलेली आणि मी उतरवून घेतलेली ही  पाककृती आज लिहून काढली. साहित्य:-  गोळ्यांसाठी- चण्याच्या डाळीचा भरडा -१ वाटी   चण्याच्या डाळीचे पीठ- १/२ वाटी   मीठ- अंदाजाने, चवीपुरते  हिंग- अंदाजाने, चिमूट...

पनीर-मटार बेक्ड करंजी

इमेज
पनीर-मटार बेक्ड करंजी. सारणासाठी साहित्य:- १. सोललेले मटार:- अर्धा किलो २. कांदा:- एक मोठा बारीक चिरून ३. वाटलेले आले-लसूण:- १ चमचा ४.हिरव्या मिरच्या:- चार बारकी चिरून ५. गरम मसाला:- १ चमचा ६.कोथिंबीर:-१ वाटीभर बारीक चिरून ७. १ लिंबाचा रस ८. पनीर १०० ग्रॅम(कमी जास्त चालते)   ९. मीठ-साखर चवीनुसार १०. फोडणीसाठी तेल, हळद, जिरे पारीचे साहित्य:- १.मैदा पाव किलो २.मीठ चवीनुसार ३.ओवा:-१/२ चमचा ४.तेल अर्धा वाटी.  ५.बेकिंग पावडर:- १/२ चमचा.   कृती:- १.कढईत चमचाभर तेलाची फोडणी करून त्यामधे, आले-लसूण-मिरची वाटण घालावे. त्यात चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर मटारदाणे घालून, झाकण ठेवून ते अर्धवट शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यात, चवीनुसार मीठ, साखर, गरम मसाला, लिंबाचा रस, किसलेले पनीर व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.  २.मैद्यामधे मीठ, अर्धवट कुटलेला ओवा, तेल, बेकिंग पावडर घालून मिसळून घ्यावा. मैद्यामधे पाणी घालून तो खूप घट्ट भिजवून घ्यावा. अर्ध्या तासाने तो चांगला कुटून मळून घ्यावा.  ३. मैद्याची पारी लाटून त्यात मटाराचे सारण भरून करंज्या तयार करून घ्याव्यात.  ४.भरल...

खंबायती हलवासन

इमेज
माझी मोठी मावशी,  सौ उषा मावशी बडोद्याला राहायची.  आमच्या लहानपणी , ती सोलापूरला येताना आमच्यासाठी खास खाऊ म्हणून खंबायतचे हलवसन आणायची. आम्हला ते फारच आवडायचे. ही मिठाई खूपच खमंग लागते आणि करायला अगदीच सोपी असते.  साहित्य:- १. म्हशीचे साय न काढलेले दूध:- अर्धा लिटर २. साजूक तूप:- तीन-चार चमचे ३. बारीक केलेला डिंक:- २ चमचे ४. भरड कणीक:- २ चमचे ५.दही:- एक चमचा ६. साखर:- अर्धा ते पाऊण वाटी ७. जायफळ आणि वेलदोडापूड:-चमचाभर ८. बदाम-पिस्ता काप कृती:- डिंकाचे मोठे खडे बारीक करून घ्यावेत. पण अगदी बारीक पूड करू नये. एका कढईत दोन चमचे तूप गरम करावे. त्यात चमचाभर डिंक फुलवून घ्यावा. डिंक तळून बाजूला काढून ठेवावा.  त्यानंतर त्याच पॅनमधे अजून चमचाभर तूप घालून त्यात चमचाभर कणीक लालसर भाजून घ्यावी. कणिक जाडसर असल्यास उत्तम. नसल्यास एक चमचा कणिक आणि एक चमचा रवाही घेता येतो. कणीक भाजून झाल्यावर, त्याच कढईत दूध घालून उकळायला ठेवावे. त्यात फुलवलेला डिंक व एक चमचा दही घालावे. हे मिश्रण सतत हालवत ठेवावे. दुसऱ्या एका पॅनखाली गॅस लावून साखर गरम करायला ठेवावी. थोड्या वेळात त्याचे कॅरॅमेल हो...

जिंजर बिस्किटे

इमेज
साहित्य :- १. कणीक/मैदा - ३०० ग्रॅम २. पिठी साखर :-१५० ग्रॅम्स ३. लोणी:-१५० ग्रॅम्स ४. सुंठ:- चहाचे दोन चमचे ५. बेकिंग ंपावडर-१ चमचा ६.मीठ :- पाव चमचा कृती:- १.लोणी व साखर फेटून घ्यावे २. फेटलेल्या मिश्रणात कणीक, बेकिंग पावडर, मीठ व सुंठ घालून सर्व एकत्र मळून घ्या.  ३.गोळा एकत्र होण्यासाठी आवश्यक तेव्हडे, पण कमीतकमी दूध घालून गोळा घट्ट मळून घ्या.  ४.या गोळ्याची जाडसर पोळी लाटून त्यावर काट्याने टोचून घ्या.  ५.आपल्याला हव्या त्या आकारात बिस्किटे कापून, ओव्हनमधे २००° फॅरनहाइटवर दहा-बारा मिनिटे भाजून घ्या

मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे)

इमेज
  मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे)  साहि त्य:- १. गव्हाचे पीठ १०० ग्रॅम्स २. ज्वारीचे पीठ १०० ग्रॅम्स ३. बेसन १०० ग्रॅमस् ४. कांदा १ ५.कोथिंबीर मूठभर ६. लसूणपाकळ्या ४-६ ७. हिरव्या मिरच्या - ४-५ ८.ओवा१ चमचा ९. जिरे १ चमचा १०. मीठ चवीनुसार ११. तेल ३० ग्रॅम्स १२. तीळ मूठभर १३. बेकिंग पावडर १ चमचा कृती:- १. कांदा, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, मीठ, जिरे, ओवा हे सगळे पदार्थ मिक्सर मधून बारीक करून घेतले.  २. गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन, मीठ आणि तेल एकत्र केले. त्यात वरील वाटलेला मसाला व बेकिंग पावडर घातली. अगदी थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला. ३. पोलपाटावर तीळ घालून त्यावर या गोळ्याची जाडसर पोळी लाटून, एका बाटलीच्या झाकणाने सारख्या आकाराच्या पुऱ्या कापून घेतल्या. ४. प्रिहिटेड ओव्हन मधे (१८०° फॅरनहाइटवर) १०-१२ मिनिटे बेक केली. तळटीप मसाले आपल्याला हवे ते आणि हव्या त्या प्रमाणात कमी-जास्त घालता येतात. बाहेरच्या खाकऱ्यामधे फार जास्त तेल/तूप असते.

ओट्स आणि आमंड्स् कुकीज

इमेज
ओट्स आणि आमंड्स् कुकीज साहित्य:- १. ओट्स १५० ग्रॅम्स २. गव्हाचे पीठ ५० ग्रॅम्स ३. साजूक तूप :- २ चमचे ४. साखर:- १२५ ग्रॅम (कमी गोड हव्या असतील तर १०० ग्रॅम) ५. लोणी:- १०० ग्रॅम ६. बदाम - ३० ते ४० ग्रॅम (आवडीनुसार ५०-६० ग्रॅम्स पर्यंत घालू शकतो)  ७. दूध:- पाव ते अर्धा वाटी. ८. बेकिंग पावडर - १ चमचा ९. आवडीप्रमाणे वेलदोडा, जायफळ, दालचिनी, लवंग, केशर १०. मीठ पाव चमचा कृती १. प्रथम १८०° फॅरनहाइटला ओव्हन गरम करायला ठेवावा.  २. एका पॅनमधे दोन चमचे तूप गरम करून त्यावर ओट्स थोडे परतून घ्यावेत. ३. एका मोठ्या तसराळ्यात किंवा परातीत लोणी व साखर एकत्र करून घ्यावे. त्यामधे कणीक, ओट्स, मीठ, बेकिंग पावडर, जायफळ/वेलदोडा/लवंग/दालचिनी यापैकी आवडीनुसार दोन-तीन पुडी घालाव्यात. त्यातच बदामाचे काप किंवा जाडसर पूड घालून मिश्रण एकत्र करावे. हे मिश्रण मिळून येण्यासाठी लागेल तसे थोडे दूध घालून पीठ मळून घ्यावे.  ४. तयार झालेल्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून, तळहातावर दाबून कुकीज ना आकार द्यावा.  ५.  गरम ओव्हनमधे १८०° फॅरनहाइटवर कुकीज १२-१५ मिनिटे भाजून घ्याव्यात.

घेवर

इमेज
आम्ही नुकतेच जयपूरला लग्नासाठी गेलो होतो. तिथले घेवर प्रसिद्ध असल्याने तिथे घेवर खायची इच्छा होती.पण तिथे होळीनंतर १५ दिवसांनी साजरा होत असलेल्या, आपल्या चित्रगौरीसारखाच 'गणगौर' या सणाच्या निमित्ताने घेवर बनणे सुरू करतात, असे कळले.त्यामुळे जयपूरमधे कुठेही ताजे घेवर मिळाले नाहीत. म्हणून आज घरीच, शुद्ध तुपातले घेवर केले! साहित्य १ तूप :- पाव वाटी (मोहन)  २. दूध:- अर्धा वाटी ३. मैदा :- एक वाटी ४. लिंबाचा रस:- अर्धा चमचा ५. बर्फाचे पाच-सहा खडे ६. तूप:- तळणीसाठी ७.साखर एक वाटी.  ८.बदाम काप कृती १.मोहन म्हणून घेतलेले तूप आणि बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून फिरवावेत .  २. तूप खूप फेटले गेल्यावर पांढरे होते. मग त्यामध्ये  दूध आणि लिंबाचा रस घालावा आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवावे.  ३ . त्यानंतर मैदा व गर पाणी (अंदाजे एक कप) घालून पातळसर पीठ करून घ्यावे घेतले.  ४. कढईत तळणीसाठी तूप चांगले तापवावे. त्यात पळीने थोडे थोडे करत वरील मिश्रण घालून घेवर तयार करून घ्यावेत.  ५. लालसर रंगावर घेवर तळून झाल्यावर , हलक्या हाताने घेवर बाहेर काढून घेऊन त्यातील तूप निथळायला ठेवावे....

नाचणीची बिस्किटे

इमेज
साहित्य १. नाचणीचे पीठ १ कप २. साजूक तूप १/२ कप ३. पिठी साखर १/२ कप किंवा चिरलेला गूळ १/२ कपाला जरा कमी ४.बेकिंग पावडर - १ चमचा ४. मीठ, वेलची, जायफळ आणि  दालचिनी पूड प्रत्येकी पाव चमचा. ५. दूध- चार ते पाच चमचे. कृती  वर दिलेले सगळे पदार्थ एकत्र केले. पीठ एकत्र मळून येण्यासाठी अगदी आवश्यक तितके दूध घातले. प्रिहिटेड ओव्हनमधे १८० डिग्री सेंटिग्रेडला २० मिनिटे भाजून घेतली. उत्तम झाली होती.  मी नाचणीचे पीठ चाळून घेत नाही कारण कोंडा निघून जातो. या बिस्कीटामधे तूप थोडे कमी चालते. म्हणजे१/२ कपा ऐवजी १/३ कप घालता येते. तूप कमी घातल्यास पीठ मळून एकत्र येण्यासाठी दूध जरा जास्त लागते. गूळ घालून केलेली बिस्किटे जास्त खमंग लागतात.