गोळ्याचे सांबर

चण्याच्या डाळीचे किंवा बेसनाचे अनेक पदार्थ आपण घरी करतो. परवा सहज बोलता बोलता माझ्या वडिलांना गोळ्याच्या सांबाराची आठवण झाली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या लहानपणीची आठवण मला सांगितली. त्यांच्या लहानपणी, त्यांच्या घरामधे स्वयंपाकाला येणाऱ्या गंगुबाई नावाच्या स्वयंपाकीण बाईंचे माझे वडील विशेष लाडके होते म्हणे. गंगुबाईंनी गोळ्याचे सांबर केले की त्या खास माझ्या वडिलांसाठी, सांबारात एकच गोळा मोठय़ा आकाराचा करायच्या आणि वडिलांना अगदी प्रेमाने तो वाढायच्या. लहानपणी इतक्या छोट्या गोष्टीचेही किती अप्रूप असते नाही? वडिलांनी आज त्यांच्या वयाच्या नव्वदीतही ती खास आठवण मनांत कुठेतरी जपून ठेवलेली आहे. बरेच दिवसांत मी गोळ्याचे सांबर केले नव्हतेच. वडिलांनी आठवण करून दिली म्हणून मीही गोळ्याचे सांबर करायचे ठरवले. माझ्या आजीने सांगितलेली आणि मी उतरवून घेतलेली ही पाककृती आज लिहून काढली. साहित्य:- गोळ्यांसाठी- चण्याच्या डाळीचा भरडा -१ वाटी चण्याच्या डाळीचे पीठ- १/२ वाटी मीठ- अंदाजाने, चवीपुरते हिंग- अंदाजाने, चिमूट...