पोस्ट्स

मार्च २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चमचमीत चकली!

इमेज
कमला नेहरू रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातल्या सारिका मावशींनी एकदा चहाबरोबर चकलीचा डबाही माझ्यासमोर ठेवला. त्या चकल्या सुधा नाईक सिस्टरांनी स्वहस्ते बनवून आणल्या होत्या, हेही समजले. चकलीचा पहिला तुकडा तोंडात घातला आणि लक्षात आलं की आपल्या उभ्या आयुष्यात खाल्लेल्या अनेक उत्तम चमचमीत चकल्यांपैकी, ही एक चकली आहे. माझ्या कुसुमआत्याच्या हातच्या चकल्याही अशाच खमंग असायच्या.  मी लगेच नाईक सिस्टरांकडून त्यांचे चकलीच्या भाजणीचे प्रमाण लिहून घेतले. भाजणीचे प्रमाण ४ वाट्या तांदूळ २ वाट्या हरभरा डाळ १/२ वाटी मूग डाळ १/४ वाटी उडीद डाळ १/४ वाटी जाड पोहे १/४ वाटी साबुदाणा २ चमचे ओवा २ चमचे जिरे २चमचे धने तांदूळ, सर्व डाळी, पोहे व साबुदाणा हे सर्व मंद आचेवर, पण तांबूस रंग येईपर्यंत, वेगवेगळे भाजून घ्यावे. तसेच धने, जिरे व ओवाही भाजून घ्यावे. हे सर्व पदार्थ थंड झाल्यावर दळून आणावेत.  चकली करताना वरील प्रमाणातल्या भाजणीला, ३/४ वाटी कडकडीत तापवलेले गोडेतेलाचे मोहन घालावे. चकलीची भाजणी परातीत घेऊन, त्यात खळे करावे. भाजणीच्या या खळ्यांत उकळते पाणी घालावे. त्यात हाताने भाजणी ढकलत-ढकलत भाजणी मिळवून घ्यावी.