पोस्ट्स

जुलै ९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे)

इमेज
  मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे)  साहि त्य:- १. गव्हाचे पीठ १०० ग्रॅम्स २. ज्वारीचे पीठ १०० ग्रॅम्स ३. बेसन १०० ग्रॅमस् ४. कांदा १ ५.कोथिंबीर मूठभर ६. लसूणपाकळ्या ४-६ ७. हिरव्या मिरच्या - ४-५ ८.ओवा१ चमचा ९. जिरे १ चमचा १०. मीठ चवीनुसार ११. तेल ३० ग्रॅम्स १२. तीळ मूठभर १३. बेकिंग पावडर १ चमचा कृती:- १. कांदा, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, मीठ, जिरे, ओवा हे सगळे पदार्थ मिक्सर मधून बारीक करून घेतले.  २. गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन, मीठ आणि तेल एकत्र केले. त्यात वरील वाटलेला मसाला व बेकिंग पावडर घातली. अगदी थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला. ३. पोलपाटावर तीळ घालून त्यावर या गोळ्याची जाडसर पोळी लाटून, एका बाटलीच्या झाकणाने सारख्या आकाराच्या पुऱ्या कापून घेतल्या. ४. प्रिहिटेड ओव्हन मधे (१८०° फॅरनहाइटवर) १०-१२ मिनिटे बेक केली. तळटीप मसाले आपल्याला हवे ते आणि हव्या त्या प्रमाणात कमी-जास्त घालता येतात. बाहेरच्या खाकऱ्यामधे फार जास्त तेल/तूप असते.

ओट्स आणि आमंड्स् कुकीज

इमेज
ओट्स आणि आमंड्स् कुकीज साहित्य:- १. ओट्स १५० ग्रॅम्स २. गव्हाचे पीठ ५० ग्रॅम्स ३. साजूक तूप :- २ चमचे ४. साखर:- १२५ ग्रॅम (कमी गोड हव्या असतील तर १०० ग्रॅम) ५. लोणी:- १०० ग्रॅम ६. बदाम - ३० ते ४० ग्रॅम (आवडीनुसार ५०-६० ग्रॅम्स पर्यंत घालू शकतो)  ७. दूध:- पाव ते अर्धा वाटी. ८. बेकिंग पावडर - १ चमचा ९. आवडीप्रमाणे वेलदोडा, जायफळ, दालचिनी, लवंग, केशर १०. मीठ पाव चमचा कृती १. प्रथम १८०° फॅरनहाइटला ओव्हन गरम करायला ठेवावा.  २. एका पॅनमधे दोन चमचे तूप गरम करून त्यावर ओट्स थोडे परतून घ्यावेत. ३. एका मोठ्या तसराळ्यात किंवा परातीत लोणी व साखर एकत्र करून घ्यावे. त्यामधे कणीक, ओट्स, मीठ, बेकिंग पावडर, जायफळ/वेलदोडा/लवंग/दालचिनी यापैकी आवडीनुसार दोन-तीन पुडी घालाव्यात. त्यातच बदामाचे काप किंवा जाडसर पूड घालून मिश्रण एकत्र करावे. हे मिश्रण मिळून येण्यासाठी लागेल तसे थोडे दूध घालून पीठ मळून घ्यावे.  ४. तयार झालेल्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून, तळहातावर दाबून कुकीज ना आकार द्यावा.  ५.  गरम ओव्हनमधे १८०° फॅरनहाइटवर कुकीज १२-१५ मिनिटे भाजून घ्याव्यात.