पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कच्चा मसाला

काल मी डाळ-मेथ्याच्या उसळीची कृती  सांगितली होती. त्या उसळीत कच्चा  मसाला घालावा, असे  लिहिले होते. ते वाचून, डॉक्टर लक्ष्मी या माझ्या बालमैत्रिणिने, कच्चा मसाला कसा करायचा असे मला विचारले. म्हणून आज कच्चा मसाला तयार करण्याची कृती देतेय.  या मसाल्याला कच्चा मसाला का म्हणतात?  या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही. इतर मसाल्यांसारखा हा वर्षभराचा करून ठेवत नसत. थोडा करून तो संपला की पुन्हा ताजा करत असत, हे एक कारण असू शकते. हा मसाला चारच पदार्थ वापरून, पटकन तयार होतो व  कुठलाही पदार्थ तळावा लागत नाही. म्हणूनही कदाचित याला कच्चा मसाला म्हणत असतील. हे आपले माझे अंदाज.  कारण काहीही असो, आपण साहित्य आणि कृती कडे वळूया.  साहित्य :- धने (शक्यतोवर हिरवे धने घ्यावेत) :- दोन फुलपात्रे भरून जिरे:- अर्धा फुलपात्र  लवंगा:- ८ ते १० दालचिनी:- ४-५ मध्यम लांबीचे तुकडे  कृती :- सर्वात आधी, कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात, मंद आचेवर धने भाजायला घ्यावेत. पाच एक मिनिटे भाजून झाले की  त्यात दालचिनी व लवंगा घालून, भाजणे चालू ठेवावे. पुन्हा पाच मिनिटांनी त्यात जिरे घालून सगळे पदार्थ परत पाच मिनिटे भाजावेत

डाळ मेथ्याची उसळ

डाळ मेथ्याची उसळ हा पदार्थ मी फक्त माझ्या माहेरीच खाल्लेला आहे. माझी आजी ती उसळ विशेष चांगली करायची. आज त्याची कृती देतेय. पण मधल्या मधल्या साहित्य :- 1.Mr तुरीची डाळ:-२ ते २.५ वाट्या सुके खोबरे:- एक छोटा तुकडा  जिरे:- १ चमचा गूळ:- १ चमचा कच्चा मसाला:-१ चमचा मीठ व तिखट:- चवीनुसार  लाल मिरच्या, कढीलिंब, लसूण, हिंग, हळद, तेल फोडणीसाठी कृती :- ही उसळ लोखंडाच्या कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात करतात. तुरीची डाळ कढईत किंवा पातेल्यात शिजवायला ठेवायची. अर्धवट(अर्धीकच्ची) शिजत आली की त्यात मोड आलेल्या मेथ्या घालायच्या व एकत्र शिजवत ठेवायचे. सुक्या खोबऱ्याचा तुकडा चिमट्यात पकडून,आगीमध्ये खरपूस भाजून घ्यायचा. पूर्वी चुलीच्या धगीत भाजून घ्यायचे, पण आता आपण गॅसवर भाजून घेऊ शकतो. भाजलेल्या खोबऱ्याला छानसा धुरकट(smoked ) वास येतो व ते काळपट होते. वेगळ्या कढईत, जिरे कोरडेच भाजून घ्यायचे. भाजलेले जिरे व खोबरे कुटून, शिजत असलेल्या डाळ-मेथ्याच्या उसळीत घालायचे. डाळ व मेथ्या एकत्रित नीट शिजल्यावर त्यात चवीपुरते मीठ, तिखट, कच्चा मसाला व गूळ घालायचा. नंतर लोखंडाच्या पळीमध्ये तेल तापवून त्य

आमटीचा गोडा मसाला (ब्राह्मणी)

काल खादाड खाऊ ग्रूपवर श्री. गिरीश कोळींनी नरसोबाच्या वाडीला गुरूजींच्या घरी ब्राह्मणी पद्धतीने केलेल्या आमटीचे वर्णन केले . त्या आमटीची चव त्यांना आवडल्यामुळे, ती कशी करायची, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. ब्राह्मणी घरांमध्ये केलेल्या आमटीत, गोडा मसालाही ब्राह्मणी पद्धतीचच हवा. त्या शिवाय आमटीला ती खास ब्राह्मणी चव येणारच नाही. हा गोडा मसाला कसा करायचा? असे श्यामला सुटोणेंनी विचारले. म्हणून मुद्दाम माझ्या आई-आजी कडून लिहून घेतलेले मसाल्याचे साहित्य आणि कृती देतेय. आई-आजी प्रमाण सांगताना मूठभर, पाव भांडे, बोटभर, चिमूटभर, दोन तुकडे असे प्रमाण सांगायच्या. मी माझ्या अंदाजाने काही वजने दिली आहेत. थोड्याफार फरकाने असा मसाला सगळ्या ब्राम्हणी घरांमध्ये करतात.   साहित्य  सुके खोबरे:- एक मोठी वाटी (१००-१२५ ग्रॅम)  तीळ:- पाणी प्यायचे फुलपात्र भरून (१००-१२५ ग्रॅम)  हिरवे धने:- कुकरचा मोठा डबाभर (पाव किलो) जिरे:-अर्धे पाणी प्यायचे फुलपात्र (१०० ते १२५ ग्रॅम) हळकुंड:-बोटाच्या पेरा ईतके १-२ तुकडे तमालपत्र:- १२-१५ पाने (५-७ ग्रॅम) दगडफूल:- अंदाजे १ वाटीभर/अर