पोस्ट्स

मार्च १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेगळ्या रूपातील, ताकातली सांडगी मिरची

इमेज
आमच्या साहवर्धन समूहाच्या सदस्य असलेल्या सौ मेदिनी अभ्यंकर यांनी वेगळ्या रूपातील सांडगी मिरची केली. सहज प्रयोग म्हणून त्यांनी सांडगी मिरच्यांच्या उरलेल्या मसाल्यात, फूड प्रोसेसेरमधून बारीक करून घेतलेल्या मिरच्या घातल्या. त्यानंतर ते मिश्रण  कडकडीत उन्हात वाळवले. तो प्रयोग यशस्वी झाला.  बरेचदा आपण अख्खी सांडगी मिरची, एखाद्या पदार्थात घातली की अनेक लोक ती मिरची बाहेर काढून टाकतात आणि फक्त आतला मसाला  खातात. त्यामुळे मिरची वाया जाते.  यावर,  मेदिनीताईंनी काढलेला, मिरच्या चुरून वापरण्याचा, हा उपाय मला फारच चांगला वाटला . या मिरच्यांची कृती वाचून माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि मी त्यांची परवानगी घेऊन इथे लिहली.  मेदिनीताईंची आणि माझी अजून प्रत्यक्ष भेट झालेली नाही पण आमची मैत्री अशा या खमंग पदार्थाच्या निमित्ताने झाली हे विशेष! साहित्य;- १.  धने -१०० ग्रॅम  २. मेथ्या किंवा मेथी दाणे- १०० ग्रॅम  ३. मीठ -३ चमचे  ४. हळद-२ चमचे  ५. हिंग पूड- १ चमचा  ६. आंबट ताक- दीड वाटी  ७. तिखट हिरव्या मिरच्या-२५० ग्रॅम  कृती- मेथी दाणे आणि धन्याची मिक्सरमधून रवाळ पूड करून घेतली. मिरची सोडून इतर पदार्थ एकत्र क