डाळ मेथ्याची उसळ
डाळ मेथ्याची उसळ हा पदार्थ मी फक्त माझ्या माहेरीच खाल्लेला आहे. माझी आजी ती उसळ विशेष चांगली करायची. आज त्याची कृती देतेय. पण मधल्या मधल्या साहित्य :- 1.Mr तुरीची डाळ:-२ ते २.५ वाट्या सुके खोबरे:- एक छोटा तुकडा जिरे:- १ चमचा गूळ:- १ चमचा कच्चा मसाला:-१ चमचा मीठ व तिखट:- चवीनुसार लाल मिरच्या, कढीलिंब, लसूण, हिंग, हळद, तेल फोडणीसाठी कृती :- ही उसळ लोखंडाच्या कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात करतात. तुरीची डाळ कढईत किंवा पातेल्यात शिजवायला ठेवायची. अर्धवट(अर्धीकच्ची) शिजत आली की त्यात मोड आलेल्या मेथ्या घालायच्या व एकत्र शिजवत ठेवायचे. सुक्या खोबऱ्याचा तुकडा चिमट्यात पकडून,आगीमध्ये खरपूस भाजून घ्यायचा. पूर्वी चुलीच्या धगीत भाजून घ्यायचे, पण आता आपण गॅसवर भाजून घेऊ शकतो. भाजलेल्या खोबऱ्याला छानसा धुरकट(smoked ) वास येतो व ते काळपट होते. वेगळ्या कढईत, जिरे कोरडेच भाजून घ्यायचे. भाजलेले जिरे व खोबरे कुटून, शिजत असलेल्या डाळ-मेथ्याच्या उसळीत घालायचे. डाळ व मेथ्या एकत्रित नीट शिजल्यावर त्यात चवीपुरते मीठ, तिखट, कच्चा मसाला व गूळ घालायचा. नंतर लोखंडाच्या पळीमध्ये तेल तापवून त्य