पोस्ट्स

मे २७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आमटीचा गोडा मसाला (ब्राह्मणी)

काल खादाड खाऊ ग्रूपवर श्री. गिरीश कोळींनी नरसोबाच्या वाडीला गुरूजींच्या घरी ब्राह्मणी पद्धतीने केलेल्या आमटीचे वर्णन केले . त्या आमटीची चव त्यांना आवडल्यामुळे, ती कशी करायची, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. ब्राह्मणी घरांमध्ये केलेल्या आमटीत, गोडा मसालाही ब्राह्मणी पद्धतीचच हवा. त्या शिवाय आमटीला ती खास ब्राह्मणी चव येणारच नाही. हा गोडा मसाला कसा करायचा? असे श्यामला सुटोणेंनी विचारले. म्हणून मुद्दाम माझ्या आई-आजी कडून लिहून घेतलेले मसाल्याचे साहित्य आणि कृती देतेय. आई-आजी प्रमाण सांगताना मूठभर, पाव भांडे, बोटभर, चिमूटभर, दोन तुकडे असे प्रमाण सांगायच्या. मी माझ्या अंदाजाने काही वजने दिली आहेत. थोड्याफार फरकाने असा मसाला सगळ्या ब्राम्हणी घरांमध्ये करतात.   साहित्य  सुके खोबरे:- एक मोठी वाटी (१००-१२५ ग्रॅम)  तीळ:- पाणी प्यायचे फुलपात्र भरून (१००-१२५ ग्रॅम)  हिरवे धने:- कुकरचा मोठा डबाभर (पाव किलो) जिरे:-अर्धे पाणी प्यायचे फुलपात्र (१०० ते १२५ ग्रॅम) हळकुंड:-बोटाच्या पेरा ईतके १-२ तुकडे तमालपत्र:- १२-१५ पाने (५-७ ग्रॅम) दगडफूल:- अंदाजे १ वाटीभर/अर