पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोलापुरी शेंगा-पोळया

इमेज
एक किलो शेंगदाणे  तीन पाव गूळ  अर्धा ते एक छटाक सुंठ  अर्धा ते एक छटाक वेलदोडे  एक छटाक बडीशोप  शेंगदाणे भाजून घ्यावेत व त्यांच  साले काढून घ्यावीत . शेंगदाणे व गूूळ एकत्र करून ते मिक्सरला वाटून घ्यावेत. नंतर त्यात सुंठ, वेलदोडा आणि बडिशोपेची पूड करून घालावी.  गव्हची कणिक सध्या पोळ्याच्या कणकेसारखीच भिजवून घ्यावी. कणकेच्या पारीच्या आकाराचा सारणाचा उंडा घेऊन, तो भरून पोळी जरा जाडसर लाटावी. गरम तव्यावर तूप सोडून पोळ्या भाजून घ्याव्यात. या पोळ्या सोलापुरात संक्रांतीच्या वेळी करतात. घट्ट साजूक तुपाबरोबर खायला मजा येते.  पुण्यात माझ्या घरी, काही वर्षांपूर्वी, रूपाली नावाची एक सोलापूरकर मोलकरीण कामाला होती. तिच्या कडून मी या पोळ्या करायला शिकले. 

शेपूची फळे!

ज्वारीच्या पिठात लसूण,तिखट,मीठ,हळद घालून भिजवून त्याचे छोटे,चपटे गोळे करून घ्यावेत.पातेल्यामधे पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवावी.चाळणीला तेल लावून त्यावर पसरून ज्वारीचे चपटे गोल ठेवावे...त्यावर बारीक चिरलेला शेपू पसरुन घालावा...परत १ थर ज्वारीच्या फळांचा ठेवून परत शेपू पसरून घालावा व २० मि..चांगले वाफवून घ्यावे... शेपूची भाजी फळांना छान चिटकते...नंतर वरून फोडणी घालावी...छान लागतात.

रसगुल्ले

इमेज
रसगुल्ले, रसमलाई, अंगूरमलाई, हे पदार्थ गेली अनेक वर्षे मी घरी करत आले आहे. ते  मला जमत होते पण अगदी उत्तम बनत नव्हते. त्यामुळे कोणी पाहुणे जेवायला येणार असले आणि जेवणाच्या बेतामधे रसगुल्ले, रसमलाई, अंगूरमलाई यापैकी काही गोड पदार्थ ठरला, तर तो मी बाहेरूनच विकत आणायचे.  मागच्या आठवड्यात, अनिता वर्मा या माझ्या पाककलानिपुण मैत्रिणीने केलेल्या रसगुल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने आमच्या ग्रुपवर पाठवले होते. ते बघितल्यावर लगेच, मी फोनवर अनिताला या पाककृतीचे 'राझ' विचारले. तिने दिलेल्या कृतीप्रमाणे रसमलाई मी करून बघितली. प्रथमच अगदी उत्तम जमल्यामुळे,मी भलतीच खूश झालेय. ती पाककृती आज माझ्या ब्लॉगवर टाकतेय. रसगुल्ल्याचा फोटो आणि व्हिडीओ मात्र मी अनिताकडूनच मागून घेतला आहे. Thanks Anita!  साहित्य:- गायीचे दूध- १ लिटर लिंबाचा रस किंवा  पांढरे व्हिनेगार किंवा सायट्रिक ऍसिड  साखर दीड कप (३०० ग्राम) कृती:- गायीचे दूध पातेल्यात तापवायला ठेवावे. तापत असताना ते सतत ढवळत राहावे. त्यामुळे त्यावर साय धरत नाही. रसगुल्ले व इतर बंगाली मिठाया करताना कधीही  म्हशीचे दूध घेऊ नये. पण पालक-पनीर, पनीर कोफ्ता

सोनेरी जवस, खसखस व लिंबाचा केक

इमेज
पुणे महानगरपालिकेच्या सोनावणे हॉस्पिटलमधल्या, डॉक्टर अनिता भोसले,  या बालरोगततज्ज्ञ मैत्रिणीने मला त्यांच्या बागेतली, ताजी पिवळी धमक लिंबे दिली होती. त्या लिंबाच्या वासामुळे, मला  Lemon-Poppyseed  केक करायचा मोह झाला.  आम्ही २०१६ साली बर्लिनला गेलो होते. त्यावेळी माझा मुलगा अनिरुद्ध तिथे एम. एस. करत होता. त्याच्याकडे एक मोठी बाटली भरून जांभळ्या रंगाची खसखस होती. मी जांभळी खसखस प्रथमच बघत होते. माझी मुलगी, असिलता, त्याच्याकडे  बर्लिनला आलेली असताना, त्या दोघांनी Lemon-poppy seed केक केला होता. त्यातली खसखस उरलेली होती. मीही लगेच तो केक करून बघितला. पिवळट रंगाच्या केकमध्ये जांभळ्या रंगाची खसखस फारच सुरेख दिसते. या केकची चवही विशेष चांगली लागते. पुढेही एक-दोन वेळा जर्मनीहून मी ती जांभळी खसखस मागवून घेतली आणि केक, मोदक तसेच इतर पदार्थांत वापरली.  त्याच केकचा, मैद्याऐवजी कणीक वापरून जरासा वेगळा प्रकार मी करून बघितला. सध्या माझ्याकडे ती जांभळी खसखस नाही. त्यामुळे आपली नेहमीचीच पांढरी खसखस मी वापरलीय. पण माझ्या मुलीने अमेरिकेहून आणलेले सोनेरी रंगाचे जवस माझ्याकडे होते. केकमध्ये पिवळा रंग घाला

कुडाळ देशकर पद्धतीची माशाची आमटी

इमेज
माझ्या आठवणीत, मासळीचा सगळ्यात चवदार रस्सा, १९८६ सालच्या डिसेंबर महिन्यांतली आहे. आमच्या लग्नानंतर ,मी आणि आनंद गोव्याला गेलो होतो. आनंदचे धाकटे मामा, बाबूमामा जोशी त्यावेळी गोव्यात राहत होते. बाबूमामांची बायको, म्हणजे आमच्या अलका मामी, माहेरच्या तेंडुलकर, म्हणजे कुडाळ देशकर आद्य गौड सारस्वत ब्राम्हण आहेत. मामींनी आम्हाला त्यांच्या माहेरच्या पद्धतीची माशाची आमटी खायला घातली होती. त्याची चव मी कधीही विसरणार नाही. अलका मामींना विचारून त्यांची ती पाककृती आज माझ्या ब्लॉगवर टाकते आहे.  साहित्य:- मासे:- बांगडा, पापलेट, सारंग, इसवण, यापैकी एखाद्या प्रकारच्या माशाचे पाच-सहा माध्यम आकाराचे तुकडे   मीठ- चवीनुसार  १ मोठ्ठ्या ओल्या नारळाचे खवलेले खोबरे (दोन वाट्या भरून खोबरे)   चिंच कोळासाठी- दोन चमचे कोळ  धने-एक ते दीड चमचा   १ कांदा- बारीक चिरून लाल तिखट- १ चमचा भरून   मिरे;- ५ ते ६   लाल तिखट  हळद- अर्धा चमचा  तांदुळाची पिठी- अर्धा चमचा  साजूक तूप/खोबऱ्याचे तेल- एक चमचा  कृती:- माशाच्या तुकड्यांना, चमचाभर मीठ लावून ठेवावे.   १५-२० मिनिटानंतर ते तुकडे एक दोन वेळा, स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावेत. य

कणीक-बदामपुडीचा केक!

इमेज
माझे अमेरिकास्थित भाऊ-वहिनी, दरवेळेस येताना माझ्या आई-वडिलांसाठी तिकडे मिळणारे आमंड मील (सालं काढलेल्या बदामाची रवाळ पूड) घेऊन येतात.सध्या ते वापरून मी वेगवेगळे पदार्थ त करून बघते आहे. परवा सकाळी सकाळी साय घुसळून लोणी काढले. ते बघून मला केक करायची हुक्की आली. पण घरात मैदा-रवा काहीच नव्हते.म्हणून कणिक आणि आमंड मील वापरून केक केला. हा केक माझ्या अंदाजाने प्रमाण घेऊन केला. तो खूपच चांगला झाला म्हणून सहज माझ्या मुलीला, असिलताला व्हिडीओ कॉल वर दाखवला. या केकला whole wheat-almond pound cake म्हणतात असे तिने मला सांगितले. त्यांनतर इंटरनेटवरच्या पाककृती बघितल्या. तिथे अनेक वेगवेगळ्या रेसिपीज आहेत.  मला अगदी रोजचा स्वयंपाक करतानाही सगळेच पदार्थ वजन करून घ्यायची सवय आहे. एकप्रकारचा चाळाच आहे म्हणा ना! त्यामुळे नेमकी पाककृती मला देता येतेय.   साहित्य :- ४ अंडी २०० ग्रॅम घरचे पांढरे लोणी २०० ग्रॅम साखर १५० ग्रॅम कणीक ७५ ग्रॅम आमंड मील (बदामाची रवाळ पूड)  चिमुटभर मीठ १ चमचा केशर इसेन्स १ चमचा बेकिंग पावडर  कृती:- कुकरच्या डब्याला तूप लावून घेतले व त्याला आतून कणिक भुरभूरवून घेतली.  कुकरची शिट्टी का

गोळ्याचे सांबर

बेसनाच्या पिठाचे अनेक पदार्थ आपण घरी करतो. परवा सहज बोलता बोलता माझ्या वडिलांना गोळ्याच्या सांबाराची आठवण झाली.  त्यानंतर त्यांनी त्यांच्या लहानपणीची आठवण मला सांगितली.  त्यांच्या लहानपणी घरात स्वयंपाकाला गंगुबाई नावाच्या  बाई होत्या. वडील गंगुबाईंचे ते विशेष लाडके होते म्हणे. गंगुताईंनी किंवा माझ्या आजीने, म्हणजेच वडिलांच्या आईने  गोळ्याचे सांबर केले की त्या खास माझ्या वडिलांसाठी, सांबारात एकच गोळा आकाराने मोठा करायच्या आणि वडिलांना अगदी प्रेमाने तो वाढायच्या. लहानपणी इतक्या छोट्या गोष्टीचेही किती अप्रूप असते नाही? वडिलांनी आज त्यांच्या वयाच्या सात्त्यांशीव्या वर्षी सुद्धा ती खास आठवण मनांत कुठेतरी जपून ठेवलेली आहे.  बरेच दिवसांत मी गोळ्याचे सांबर केले नव्हतेच. डिलांनी आठवण करून दिली म्हणून मीही गोळ्याचे सांबर करायचे ठरवले. माझ्या आजीने सांगितलेली आणि मी उतरवून घेतलेली ही  पाककृती आज लिहून काढली. साहित्य:-  गोळ्यांसाठी- चण्याच्या डाळीचा भरडा -१ वाटी   चण्याच्या डाळीचे पीठ- १/२ वाटी   मीठ- अंदाजाने, चवीपुरते  हिंग- अंदाजाने, चिमूटभर  हळद- अंदाजाने, चिमूटभर  तिखट - अंदाजाने, चिमूटभर  जि

कच्चा मसाला

काल मी डाळ-मेथ्याच्या उसळीची कृती  सांगितली होती. त्या उसळीत कच्चा  मसाला घालावा, असे  लिहिले होते. ते वाचून, डॉक्टर लक्ष्मी या माझ्या बालमैत्रिणिने, कच्चा मसाला कसा करायचा असे मला विचारले. म्हणून आज कच्चा मसाला तयार करण्याची कृती देतेय.  या मसाल्याला कच्चा मसाला का म्हणतात?  या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही. इतर मसाल्यांसारखा हा वर्षभराचा करून ठेवत नसत. थोडा करून तो संपला की पुन्हा ताजा करत असत, हे एक कारण असू शकते. हा मसाला चारच पदार्थ वापरून, पटकन तयार होतो व  कुठलाही पदार्थ तळावा लागत नाही. म्हणूनही कदाचित याला कच्चा मसाला म्हणत असतील. हे आपले माझे अंदाज.  कारण काहीही असो, आपण साहित्य आणि कृती कडे वळूया.  साहित्य :- धने (शक्यतोवर हिरवे धने घ्यावेत) :- दोन फुलपात्रे भरून जिरे:- अर्धा फुलपात्र  लवंगा:- ८ ते १० दालचिनी:- ४-५ मध्यम लांबीचे तुकडे  कृती :- सर्वात आधी, कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात, मंद आचेवर धने भाजायला घ्यावेत. पाच एक मिनिटे भाजून झाले की  त्यात दालचिनी व लवंगा घालून, भाजणे चालू ठेवावे. पुन्हा पाच मिनिटांनी त्यात जिरे घालून सगळे पदार्थ परत पाच मिनिटे भाजावेत

डाळ मेथ्याची उसळ

डाळ मेथ्याची उसळ हा पदार्थ मी फक्त माझ्या माहेरीच खाल्लेला आहे. माझी आजी ती उसळ विशेष चांगली करायची. आज त्याची कृती देतेय. पण मधल्या मधल्या साहित्य :- 1.Mr तुरीची डाळ:-२ ते २.५ वाट्या सुके खोबरे:- एक छोटा तुकडा  जिरे:- १ चमचा गूळ:- १ चमचा कच्चा मसाला:-१ चमचा मीठ व तिखट:- चवीनुसार  लाल मिरच्या, कढीलिंब, लसूण, हिंग, हळद, तेल फोडणीसाठी कृती :- ही उसळ लोखंडाच्या कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात करतात. तुरीची डाळ कढईत किंवा पातेल्यात शिजवायला ठेवायची. अर्धवट(अर्धीकच्ची) शिजत आली की त्यात मोड आलेल्या मेथ्या घालायच्या व एकत्र शिजवत ठेवायचे. सुक्या खोबऱ्याचा तुकडा चिमट्यात पकडून,आगीमध्ये खरपूस भाजून घ्यायचा. पूर्वी चुलीच्या धगीत भाजून घ्यायचे, पण आता आपण गॅसवर भाजून घेऊ शकतो. भाजलेल्या खोबऱ्याला छानसा धुरकट(smoked ) वास येतो व ते काळपट होते. वेगळ्या कढईत, जिरे कोरडेच भाजून घ्यायचे. भाजलेले जिरे व खोबरे कुटून, शिजत असलेल्या डाळ-मेथ्याच्या उसळीत घालायचे. डाळ व मेथ्या एकत्रित नीट शिजल्यावर त्यात चवीपुरते मीठ, तिखट, कच्चा मसाला व गूळ घालायचा. नंतर लोखंडाच्या पळीमध्ये तेल तापवून त्य

आमटीचा गोडा मसाला (ब्राह्मणी)

काल खादाड खाऊ ग्रूपवर श्री. गिरीश कोळींनी नरसोबाच्या वाडीला गुरूजींच्या घरी ब्राह्मणी पद्धतीने केलेल्या आमटीचे वर्णन केले . त्या आमटीची चव त्यांना आवडल्यामुळे, ती कशी करायची, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. ब्राह्मणी घरांमध्ये केलेल्या आमटीत, गोडा मसालाही ब्राह्मणी पद्धतीचच हवा. त्या शिवाय आमटीला ती खास ब्राह्मणी चव येणारच नाही. हा गोडा मसाला कसा करायचा? असे श्यामला सुटोणेंनी विचारले. म्हणून मुद्दाम माझ्या आई-आजी कडून लिहून घेतलेले मसाल्याचे साहित्य आणि कृती देतेय. आई-आजी प्रमाण सांगताना मूठभर, पाव भांडे, बोटभर, चिमूटभर, दोन तुकडे असे प्रमाण सांगायच्या. मी माझ्या अंदाजाने काही वजने दिली आहेत. थोड्याफार फरकाने असा मसाला सगळ्या ब्राम्हणी घरांमध्ये करतात.   साहित्य  सुके खोबरे:- एक मोठी वाटी (१००-१२५ ग्रॅम)  तीळ:- पाणी प्यायचे फुलपात्र भरून (१००-१२५ ग्रॅम)  हिरवे धने:- कुकरचा मोठा डबाभर (पाव किलो) जिरे:-अर्धे पाणी प्यायचे फुलपात्र (१०० ते १२५ ग्रॅम) हळकुंड:-बोटाच्या पेरा ईतके १-२ तुकडे तमालपत्र:- १२-१५ पाने (५-७ ग्रॅम) दगडफूल:- अंदाजे १ वाटीभर/अर

साटोऱ्या

फेसबुकवरच्या आमच्या  'खादाड खाऊ' ग्रुपचे सदस्य राजीव कुलकर्णीं यांनी नुकतीच एक हळहळ ग्रूपवर व्यक्त केली. कुणीतरी ऑफर केलेल्या साटोरीला 'नको' म्हणण्याची चूक त्यांच्याकडून घडली! काहींनी त्यांच्या दुःखावर फुंकर घातली तर काहींनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.एकुणात काय  ग्रुपवर साटोरीवरच चर्चा सुरू झाली. मग ग्रुपवरील तनया जी एम ने मला सटोरीची पाककृती देण्याचा लाडिक आग्रह केला. म्हणून माझी पाककृतींची वही उघडून माझ्या आईने शिकवलेली साटोरीची कृती लिहून काढली. सारण:- खवा पाव किलो. (२५० ग्रॅम), बारीक रवा पाव वाटी (चार टेबलस्पून) तुपावर तांबूस भाजून घ्यावा. रवा गरम असतानाच दुधाचा हबका मारून घ्यावा. हा रवा आणि खवा मिसळून घ्यावा. खव्याच्या इतकीच पिठीसाखर त्यात मिसळावी. यामध्ये भाजलेल्या खसखसीची पूड साधारण पाव वाटी व स्वादासाठी वेलची पूड अथवा जायफळ पूड घालावी. पारी:- आध पाव (१२५ ग्रॅम ) बारीक रवा व  तीन पाव (७५० ग्रॅम ) मैदा एकत्र करावे. त्यात दोन टेबलस्पून साजूक तुपाचे मोहन गरम करून घालावे. चवीपुरते मीठ घालावे. हा रवा-मैदा दुधात( आई बरेचदा निरसे दूध घ्यायची) घट