सोलापुरी शेंगा-पोळया
- एक किलो शेंगदाणे
- तीन पाव गूळ
- अर्धा ते एक छटाक सुंठ
- अर्धा ते एक छटाक वेलदोडे
- एक छटाक बडीशोप
गव्हची कणिक सध्या पोळ्याच्या कणकेसारखीच भिजवून घ्यावी.
कणकेच्या पारीच्या आकाराचा सारणाचा उंडा घेऊन, तो भरून पोळी जरा जाडसर लाटावी.
गरम तव्यावर तूप सोडून पोळ्या भाजून घ्याव्यात.
या पोळ्या सोलापुरात संक्रांतीच्या वेळी करतात. घट्ट साजूक तुपाबरोबर खायला मजा येते.
पुण्यात माझ्या घरी, काही वर्षांपूर्वी, रूपाली नावाची एक सोलापूरकर मोलकरीण कामाला होती. तिच्या कडून मी या पोळ्या करायला शिकले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा