चमचमीत चकली!
कमला नेहरू रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातल्या सारिका मावशींनी एकदा चहाबरोबर चकलीचा डबाही माझ्यासमोर ठेवला. त्या चकल्या सुधा नाईक सिस्टरांनी स्वहस्ते बनवून आणल्या होत्या, हेही समजले. चकलीचा पहिला तुकडा तोंडात घातला आणि लक्षात आलं की आपल्या उभ्या आयुष्यात खाल्लेल्या अनेक उत्तम चमचमीत चकल्यांपैकी, ही एक चकली आहे. माझ्या कुसुमआत्याच्या हातच्या चकल्याही अशाच खमंग असायच्या.
मी लगेच नाईक सिस्टरांकडून त्यांचे चकलीच्या भाजणीचे प्रमाण लिहून घेतले.
भाजणीचे प्रमाण
४ वाट्या तांदूळ
२ वाट्या हरभरा डाळ
१/२ वाटी मूग डाळ
१/४ वाटी उडीद डाळ
१/४ वाटी जाड पोहे
१/४ वाटी साबुदाणा
२ चमचे ओवा
२ चमचे जिरे
२चमचे धने
तांदूळ, सर्व डाळी, पोहे व साबुदाणा हे सर्व मंद आचेवर, पण तांबूस रंग येईपर्यंत, वेगवेगळे भाजून घ्यावे. तसेच धने, जिरे व ओवाही भाजून घ्यावे. हे सर्व पदार्थ थंड झाल्यावर दळून आणावेत.
चकली करताना वरील प्रमाणातल्या भाजणीला, ३/४ वाटी कडकडीत तापवलेले गोडेतेलाचे मोहन घालावे.
चकलीची भाजणी परातीत घेऊन, त्यात खळे करावे. भाजणीच्या या खळ्यांत उकळते पाणी घालावे. त्यात हाताने भाजणी ढकलत-ढकलत भाजणी मिळवून घ्यावी. ती गरम असतानाच थंड पाण्यात हात बुडवून, हाताने चांगली मळून घ्यावी.
मळलेल्या पिठात, चवीपुरते मीठ, लाल तिखट व पांढरे तीळ घालून, चकल्या तळून घ्याव्यात.
माझी आईदेखील उत्तम चकल्या करायची. ती घरीच चकलीची भाजणी करायची, त्या भाजणीचे प्रमाण आणि तिची चकली करण्याची कृती पण देते आहे.
४ कोळवे (एक मोठे फुलपात्र ) तांदूळ
२ कोळवे हरभरा डाळ
१ कोळवे उडीदडाळ
१ मूठभर तूरडाळ
१/२ वाटी धने
१/२ वाटी जिरे
१ चमचाभर ओवा
तांदूळ आणि सगळ्या डाळी वेगवेगळ्या धुवून सुती कापडावर पसरून घरातच सुकवून घ्याव्यात. प्रत्येक धान्य, कढईत घालून, मंद आचेवर गुलाबी रंगावर वेगवेगळे भाजून घ्यावे. धने, जिरे व ओवा हलके भाजून घेऊन, भाजलेल्या डाळ-तांदूळात घालावे. हे धान्य दळून आणावे.
दोन भांडी भाजणीसाठी चार चमचे लोणी घालून, चवीनुसार तिखट, मीठ, हळद हिंग व पांढरे तीळ घालून पीठ मळून घ्यावे व चकल्या तळाव्यात.
चकल्या तळण्यातही काही खास कौशल्य दडलेले असते. ते कौशल्य मात्र, सुधाताई नाईक सिस्टर, किंवा कुसुमआत्या, किंवा माझ्या आईसारख्या एखाद्या सुगरणीच्या हाताखाली काम केल्याशिवाय येणार नाही आणि तुमची चकली चमचमीत होणार नाही, हेच खरे!
Thanks for such an amazing recipe mam.
उत्तर द्याहटवाShe is my super chef mom.....she knows many recipes especially Non veg ones are super yummy!
उत्तर द्याहटवाThank you blogger for publishing this and giving her the opportunity to share her talent on this platform, I'm sure she truly deserves this.
Thank you
खरंच गं. विशेष चांगल्या चकल्या होत्या. त्यांच्या कडून अजूनही बरेच शिकण्यासारखे असणार आहे.
हटवाYes she is a wonderful at cooking especially non-vegetarian . My favourite is prawns Biryani 🤤
हटवाSuch a nice recipe Mam, Keep it up and keep us updating with such amazing recipes
उत्तर द्याहटवानिश्चित!
हटवासुधा नाईक माझी ताई बर का.....ताईच्या हाताला एक वेगळीच चव अजून बर्याच recipies आहेत तिच्याकडे.....luv you tai
उत्तर द्याहटवानिश्चित असणार. मी एकेक करून घेईन आणि प्रसिद्ध करेन. आपल्या सगळ्यांना उपयोग होईल की नाही?
हटवाIt was superb tasty chakli kaki👌🏻..loved it.. even many more food items you know in veg and non veg specially. Keep going with different dishes so that we can have it everytime 😜, but on a serious note we are proud to have 'Chef Kaki' in our family😊. All the best 🎉
उत्तर द्याहटवाखरंय!
हटवाShe's my mom... Super talented.. And best chef for us.. Nothing can beat her food.. May it be fish curry or chakali.. Sgez the best😘😘❤❤
उत्तर द्याहटवाअगदी खरं आहे. म्हणूनच मी लिहिले. पण सवड न मिळाल्याने जरा उशीर झाला.
हटवासाक्षीदार आहे मी त्या अप्रतिम चवीचा. अनेकांना हेवा वाटेल पण नुकत्याच २ चकल्या संपवल्यात हि कमेंट करण्याआधी ... :) असे अनेक उत्तम पदार्थ आवडीने बनवून प्रेमाने खाऊ घालणाऱ्या सासूबाईंचा खूप अभिमान वाटतो..
उत्तर द्याहटवाअरे व्वा.. छानच की!
हटवाOne of the tastiest Fish Curries I have had in my life, by My Mami.I Adore her cooking skills. Hopefully, After reading this, I will get an Invite.😃😃😃
उत्तर द्याहटवा🙂 Above Message By Navneet Naik
उत्तर द्याहटवाOk. I need to taste her fish curry as well!
हटवा