पनीर-मटार बेक्ड करंजी
पनीर-मटार बेक्ड करंजी.
सारणासाठी साहित्य:-
१. सोललेले मटार:- अर्धा किलो
२. कांदा:- एक मोठा बारीक चिरून
३. वाटलेले आले-लसूण:- १ चमचा
४.हिरव्या मिरच्या:- चार बारकी चिरून
५. गरम मसाला:- १ चमचा
६.कोथिंबीर:-१ वाटीभर बारीक चिरून
७. १ लिंबाचा रस
९. मीठ-साखर चवीनुसार
१०. फोडणीसाठी तेल, हळद, जिरे
पारीचे साहित्य:-
१.मैदा पाव किलो
२.मीठ चवीनुसार
३.ओवा:-१/२ चमचा
४.तेल अर्धा वाटी.
५.बेकिंग पावडर:- १/२ चमचा.
कृती:-
१.कढईत चमचाभर तेलाची फोडणी करून त्यामधे, आले-लसूण-मिरची वाटण घालावे. त्यात चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर मटारदाणे घालून, झाकण ठेवून ते अर्धवट शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यात, चवीनुसार मीठ, साखर, गरम मसाला, लिंबाचा रस, किसलेले पनीर व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
२.मैद्यामधे मीठ, अर्धवट कुटलेला ओवा, तेल, बेकिंग पावडर घालून मिसळून घ्यावा. मैद्यामधे पाणी घालून तो खूप घट्ट भिजवून घ्यावा. अर्ध्या तासाने तो चांगला कुटून मळून घ्यावा.
३. मैद्याची पारी लाटून त्यात मटाराचे सारण भरून करंज्या तयार करून घ्याव्यात.
४.भरलेल्या करंज्या ट्रेमधे ठेवून त्यावरून थोडे तेल/तूप/लोणी लावून घ्यावे. नंतर ट्रे ओव्हनमधे ठेवून, २००° फॅरनहाइईटवर २०-२५ मिनिटे भाजून घ्याव्यात.
५.चिंचगुळाची चटणी आणि कोथिंबीर - पुदिन्याच्या हिरव्या चटणी अथवा टोमॅटो सॉसबरोबर करंज्या खायला द्याव्यात.
तळटीप:- या कारंज्यांच्या सरणामध्ये पनीर ऐवजी किंवा पनीर बरोबर थोडे चीझ घेतल्यास त्या अजूनच चविष्ट लागतात!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा