छोले क्रॅकर्स
साहित्य:-
१. उकडलेले छोले १ कप
२. मसुराचे पीठ १/२ कप
३. Olive oil २ चहाचे चमचे
४. चिया सीडस् २ चहाचे चमचे
५. कलौंजी २ चहाचे चमचे
६. लाल तिखट १ चहाचा चमचा
७. लसूण पूड १ चहाचा चमचा
८. हळद १/४ चहाचा चमचा
९. मीठ १/२ चहाचा चमचा
१०. बेकिंग पावडर १/४ चहाचा चमचा
कृती:-
१. उकडलेले छोले मिक्सरवर वाटून घ्या. त्यामधे वरील सर्व पदार्थ घालून गोळा १५-२० मिनिटे भिजवून ठेवा.
२. बटरपेपरला थोडे तेल लावून त्यावर हा गोळा ठेवा. गोळा हाताने दाबून पातळ करा.
३. ट्रे ओव्हनमधे ठेवून, १८०°फॅरनहाइटवर २०-२५ क्रॅकर्स भाजून घ्या. एखाद्या क्रिमी डिप मधे बुडवून खा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा