पोस्ट्स

मे ३०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कच्चा मसाला

काल मी डाळ-मेथ्याच्या उसळीची कृती  सांगितली होती. त्या उसळीत कच्चा  मसाला घालावा, असे  लिहिले होते. ते वाचून, डॉक्टर लक्ष्मी या माझ्या बालमैत्रिणिने, कच्चा मसाला कसा करायचा असे मला विचारले. म्हणून आज कच्चा मसाला तयार करण्याची कृती देतेय.  या मसाल्याला कच्चा मसाला का म्हणतात?  या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही. इतर मसाल्यांसारखा हा वर्षभराचा करून ठेवत नसत. थोडा करून तो संपला की पुन्हा ताजा करत असत, हे एक कारण असू शकते. हा मसाला चारच पदार्थ वापरून, पटकन तयार होतो व  कुठलाही पदार्थ तळावा लागत नाही. म्हणूनही कदाचित याला कच्चा मसाला म्हणत असतील. हे आपले माझे अंदाज.  कारण काहीही असो, आपण साहित्य आणि कृती कडे वळूया.  साहित्य :- धने (शक्यतोवर हिरवे धने घ्यावेत) :- दोन फुलपात्रे भरून जिरे:- अर्धा फुलपात्र  लवंगा:- ८ ते १० दालचिनी:- ४-५ मध्यम लांबीचे तुकडे  कृती :- सर्वात आधी, कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात, मंद आचेवर धने भाजायला घ्यावेत. पाच एक मिनिटे भाजून झाले की  त्यात दालचिनी व लवंगा घालून, भाजणे चालू ठेवावे. पुन्हा पाच मिनिटांनी त्यात जिरे घालून सगळे पदार्थ परत पाच मिनिटे भाजावेत