कणीक घालून केलेल्या, अंडेविरहित केळ्याच्या कुकीज्
साहित्य:- १. पिकलेली केळी :- २ ते तीन २. लोणी:- २०० ग्रॅम ३.साखर:- १५० ते १७५ ग्रॅम ४. कणीक:- २०० ग्रॅम ५. बेकिंग पावडर :- चहाचा १ चमचा ६. दालचिनी पूड:- चहाचा १ चमचा ७. जायफळाची पूड:- चहाचा अर्धा चमचा ८. सुंठपूड:- चहाचा अर्धा चमचा ९. मीठ:- चहाचा अर्धा चमचा १०. बदामाचे तुकडे:- अर्धा वटी ऐच्छिक कृती:- १. लोणी व साखर फेटून घेतले. २. केळी सोलून घेऊन त्याचा लगदा करून घेतला. तो लगदा लोणी व साखरेत मिसळला. ३. कणीक, मीठ, बेकिंग पावडर, दालचिनी पूड, जायफळपूड, सुंठ असे सगळे कोरडे पदार्थ एकत्र करून घेतले. ४. कोरड्या पदार्थांचे मिश्रण थोडे थोडे करत केळी+लोणी+साखरेच्या मिश्रणात घालून, कणीक मळून घेतली. ५. ओव्हन पाच-सात मिनिटे १८०सेंटिग्रेडवर गरम करून घेतला. ६. बिस्कीटाच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते ट्रेनमधे घालून साधारण ३० मिनिटे भाजून घेतले. तळटीप:- १.साखर आपल्या आवडीनुसार व केळ्याच्या गोडीचा अंदाज घेऊन कमी-जास्त करण्यास हरकत नाही. २. स्वादासाठी वेलदोडा, कॉफी, कोको असे इतर पदार्थ वापरता येतील. ३. बदामाचे ऐवजी काजूचे तीकडे, ...