कणीक घालून केलेल्या, अंडेविरहित केळ्याच्या कुकीज्
साहित्य:-
१. पिकलेली केळी :- २ ते तीन
२. लोणी:- २०० ग्रॅम
३.साखर:- १५० ते १७५ ग्रॅम
४. कणीक:- २०० ग्रॅम
५. बेकिंग पावडर :- चहाचा १ चमचा
६. दालचिनी पूड:- चहाचा १ चमचा
७. जायफळाची पूड:- चहाचा अर्धा चमचा
८. सुंठपूड:- चहाचा अर्धा चमचा
९. मीठ:- चहाचा अर्धा चमचा
१०. बदामाचे तुकडे:- अर्धा वटी ऐच्छिक
कृती:-
१. लोणी व साखर फेटून घेतले.
२. केळी सोलून घेऊन त्याचा लगदा करून घेतला. तो लगदा लोणी व साखरेत मिसळला.
३. कणीक, मीठ, बेकिंग पावडर, दालचिनी पूड, जायफळपूड, सुंठ असे सगळे कोरडे पदार्थ एकत्र करून घेतले.
४. कोरड्या पदार्थांचे मिश्रण थोडे थोडे करत केळी+लोणी+साखरेच्या मिश्रणात घालून, कणीक मळून घेतली.
५. ओव्हन पाच-सात मिनिटे १८०सेंटिग्रेडवर गरम करून घेतला.
६. बिस्कीटाच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते ट्रेनमधे घालून साधारण ३० मिनिटे भाजून घेतले.
तळटीप:-
१.साखर आपल्या आवडीनुसार व केळ्याच्या गोडीचा अंदाज घेऊन कमी-जास्त करण्यास हरकत नाही.
२. स्वादासाठी वेलदोडा, कॉफी, कोको असे इतर पदार्थ वापरता येतील.
३. बदामाचे ऐवजी काजूचे तीकडे, खसखस, चॉकलेट चिप्स, अक्रोडाचे तुकडे वापरता येतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा