बिनअंड्याचा लुसलुशीत केक!

 साहित्य:-


१. मैदा:-३३० ग्रॅम (२.५ कप) 

२. साखर:- ३०० ग्रॅम(१.५ कप)
 
३.बेकिंग पावडर :- २.५ चहाचा चमचा

४. बेकिंग सोडा:- १/२ चहाचा चमचा


५. मीठ:- १/२ चहाचा चमचा

६. दही:- ३/४ कप(१७५ते  १८५ मिली ) 

७. तेल :- १/२ कप (१२० मिली) 

८. लोणी:- १/४ कप (५० मिली) 

९. दूध:- २०० ते २५० मिली ( ३/४ ते १ कप) 

१०. व्हॅनिला इसेन्स :-१ चहाचा चमचा

कृती:-

१. केकचा डबा आतून तेल लावून व पीठ भुरभुरवून अथवा खाल बटरपेपर लावून तयार ठेवावा. ओव्हन १६०°सेंटीग्रेडला १० मिनिटे तापवत ठेवावा. 

२. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व मीठ एकत्र करून घ्यावे. 

३. तेल, लोणी, दही, साखर व व्हॅनिला इसेन्स एकत्र करून चांगले फेटावे. 

४. वरील मिश्रणात मैद्याचे मिश्रण हळूहळू घालून ते सगळे एका दिशेने फिरवत एकत्र करावे. या मिश्रणात अंदाजे १ कप दूध घालून एकत्र करावे व तयार केलेल्या केकच्या डब्यात ते ओतावे.
 
५. केकचा डबा गरम ओव्हनमधे १६०° सेंटीग्रेडला ठेवून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे केक भाजून घ्यावा. 

तळटीप:-

१. लोण्याचे आणि तेलाचे प्रमाण कमी जास्त करता येते. उन्हाळ्यात लोणी जास्त घ्यावे व थंडीत लोणी कमी घालावे. लोण्याचा स्वाद चांगला लागतो पण लोण्यामुळे केक दडस होतो तर तेलामुळे लुसलुशीत होतो. तसेच तेल घातलेला केक फ्रिजमध्ये ठेवता येतो. 
२. या केकमधे, व्हॅनिला इसेन्सच्या  जायफळ आणि वेलदोड्याची पूड खूप छान  लागते.

टिप्पण्या

  1. व्वा साधा,सोपा,कमी साहित्य असणारा,घरच्याच सामानात होणारा केक
    माझ्यासारखां ना खाता येईलव आवडेल असा केक

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेपूची फळं!

छोले क्रॅकर्स

ग्रीक योगर्ट क्रॅकर्स!