पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेपूची फळे!

ज्वारीच्या पिठात लसूण,तिखट,मीठ,हळद घालून भिजवून त्याचे छोटे,चपटे गोळे करून घ्यावेत.पातेल्यामधे पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवावी.चाळणीला तेल लावून त्यावर पसरून ज्वारीचे चपटे गोल ठेवावे...त्यावर बारीक चिरलेला शेपू पसरुन घालावा...परत १ थर ज्वारीच्या फळांचा ठेवून परत शेपू पसरून घालावा व २० मि..चांगले वाफवून घ्यावे... शेपूची भाजी फळांना छान चिटकते...नंतर वरून फोडणी घालावी...छान लागतात.

रसगुल्ले

इमेज
रसगुल्ले, रसमलाई, अंगूरमलाई, हे पदार्थ गेली अनेक वर्षे मी घरी करत आले आहे. ते  मला जमत होते पण अगदी उत्तम बनत नव्हते. त्यामुळे कोणी पाहुणे जेवायला येणार असले आणि जेवणाच्या बेतामधे रसगुल्ले, रसमलाई, अंगूरमलाई यापैकी काही गोड पदार्थ ठरला, तर तो मी बाहेरूनच विकत आणायचे.  मागच्या आठवड्यात, अनिता वर्मा या माझ्या पाककलानिपुण मैत्रिणीने केलेल्या रसगुल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने आमच्या ग्रुपवर पाठवले होते. ते बघितल्यावर लगेच, मी फोनवर अनिताला या पाककृतीचे 'राझ' विचारले. तिने दिलेल्या कृतीप्रमाणे रसमलाई मी करून बघितली. प्रथमच अगदी उत्तम जमल्यामुळे,मी भलतीच खूश झालेय. ती पाककृती आज माझ्या ब्लॉगवर टाकतेय. रसगुल्ल्याचा फोटो आणि व्हिडीओ मात्र मी अनिताकडूनच मागून घेतला आहे. Thanks Anita!  साहित्य:- गायीचे दूध- १ लिटर लिंबाचा रस किंवा  पांढरे व्हिनेगार किंवा सायट्रिक ऍसिड  साखर दीड कप (३०० ग्राम) कृती:- गायीचे दूध पातेल्यात तापवायला ठेवावे. तापत असताना ते सतत ढवळत राहावे. त्यामुळे त्यावर साय धरत नाही. रसगुल्ले व इतर बंगाली मिठाया करताना कधीही  म्हशीचे दूध घेऊ नये. पण पालक-पनीर, पनीर कोफ्ता

सोनेरी जवस, खसखस व लिंबाचा केक

इमेज
पुणे महानगरपालिकेच्या सोनावणे हॉस्पिटलमधल्या, डॉक्टर अनिता भोसले,  या बालरोगततज्ज्ञ मैत्रिणीने मला त्यांच्या बागेतली, ताजी पिवळी धमक लिंबे दिली होती. त्या लिंबाच्या वासामुळे, मला  Lemon-Poppyseed  केक करायचा मोह झाला.  आम्ही २०१६ साली बर्लिनला गेलो होते. त्यावेळी माझा मुलगा अनिरुद्ध तिथे एम. एस. करत होता. त्याच्याकडे एक मोठी बाटली भरून जांभळ्या रंगाची खसखस होती. मी जांभळी खसखस प्रथमच बघत होते. माझी मुलगी, असिलता, त्याच्याकडे  बर्लिनला आलेली असताना, त्या दोघांनी Lemon-poppy seed केक केला होता. त्यातली खसखस उरलेली होती. मीही लगेच तो केक करून बघितला. पिवळट रंगाच्या केकमध्ये जांभळ्या रंगाची खसखस फारच सुरेख दिसते. या केकची चवही विशेष चांगली लागते. पुढेही एक-दोन वेळा जर्मनीहून मी ती जांभळी खसखस मागवून घेतली आणि केक, मोदक तसेच इतर पदार्थांत वापरली.  त्याच केकचा, मैद्याऐवजी कणीक वापरून जरासा वेगळा प्रकार मी करून बघितला. सध्या माझ्याकडे ती जांभळी खसखस नाही. त्यामुळे आपली नेहमीचीच पांढरी खसखस मी वापरलीय. पण माझ्या मुलीने अमेरिकेहून आणलेले सोनेरी रंगाचे जवस माझ्याकडे होते. केकमध्ये पिवळा रंग घाला

कुडाळ देशकर पद्धतीची माशाची आमटी

इमेज
माझ्या आठवणीत, मासळीचा सगळ्यात चवदार रस्सा, १९८६ सालच्या डिसेंबर महिन्यांतली आहे. आमच्या लग्नानंतर ,मी आणि आनंद गोव्याला गेलो होतो. आनंदचे धाकटे मामा, बाबूमामा जोशी त्यावेळी गोव्यात राहत होते. बाबूमामांची बायको, म्हणजे आमच्या अलका मामी, माहेरच्या तेंडुलकर, म्हणजे कुडाळ देशकर आद्य गौड सारस्वत ब्राम्हण आहेत. मामींनी आम्हाला त्यांच्या माहेरच्या पद्धतीची माशाची आमटी खायला घातली होती. त्याची चव मी कधीही विसरणार नाही. अलका मामींना विचारून त्यांची ती पाककृती आज माझ्या ब्लॉगवर टाकते आहे.  साहित्य:- मासे:- बांगडा, पापलेट, सारंग, इसवण, यापैकी एखाद्या प्रकारच्या माशाचे पाच-सहा माध्यम आकाराचे तुकडे   मीठ- चवीनुसार  १ मोठ्ठ्या ओल्या नारळाचे खवलेले खोबरे (दोन वाट्या भरून खोबरे)   चिंच कोळासाठी- दोन चमचे कोळ  धने-एक ते दीड चमचा   १ कांदा- बारीक चिरून लाल तिखट- १ चमचा भरून   मिरे;- ५ ते ६   लाल तिखट  हळद- अर्धा चमचा  तांदुळाची पिठी- अर्धा चमचा  साजूक तूप/खोबऱ्याचे तेल- एक चमचा  कृती:- माशाच्या तुकड्यांना, चमचाभर मीठ लावून ठेवावे.   १५-२० मिनिटानंतर ते तुकडे एक दोन वेळा, स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावेत. य