मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे)

 मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे) 

साहित्य:-
१. गव्हाचे पीठ १०० ग्रॅम्स
२. ज्वारीचे पीठ १०० ग्रॅम्स
३. बेसन १०० ग्रॅमस्
४. कांदा १
५.कोथिंबीर मूठभर
६. लसूणपाकळ्या ४-६
७. हिरव्या मिरच्या - ४-५
८.ओवा१ चमचा
९. जिरे १ चमचा
१०. मीठ चवीनुसार
११. तेल ३० ग्रॅम्स
१२. तीळ मूठभर
१३. बेकिंग पावडर १ चमचा

कृती:-
१. कांदा, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, मीठ, जिरे, ओवा हे सगळे पदार्थ मिक्सर मधून बारीक करून घेतले. 

२. गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन, मीठ आणि तेल एकत्र केले. त्यात वरील वाटलेला मसाला व बेकिंग पावडर घातली. अगदी थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला.

३. पोलपाटावर तीळ घालून त्यावर या गोळ्याची जाडसर पोळी लाटून, एका बाटलीच्या झाकणाने सारख्या आकाराच्या पुऱ्या कापून घेतल्या.
४. प्रिहिटेड ओव्हन मधे (१८०° फॅरनहाइटवर) १०-१२ मिनिटे बेक केली.

तळटीप
मसाले आपल्याला हवे ते आणि हव्या त्या प्रमाणात कमी-जास्त घालता येतात. बाहेरच्या खाकऱ्यामधे फार जास्त तेल/तूप असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पनीर-मटार बेक्ड करंजी

चमचमीत चकली!

डाळ मेथ्याची उसळ