ओट्स आणि आमंड्स् कुकीज

ओट्स आणि आमंड्स् कुकीज

साहित्य:-
१. ओट्स १५० ग्रॅम्स
२. गव्हाचे पीठ ५० ग्रॅम्स
३. साजूक तूप :- २ चमचे
४. साखर:- १२५ ग्रॅम (कमी गोड हव्या असतील तर १०० ग्रॅम)
५. लोणी:- १०० ग्रॅम
६. बदाम - ३० ते ४० ग्रॅम (आवडीनुसार ५०-६० ग्रॅम्स पर्यंत घालू शकतो) 
७. दूध:- पाव ते अर्धा वाटी.
८. बेकिंग पावडर - १ चमचा
९. आवडीप्रमाणे वेलदोडा, जायफळ, दालचिनी, लवंग, केशर
१०. मीठ पाव चमचा

कृती

१. प्रथम १८०° फॅरनहाइटला ओव्हन गरम करायला ठेवावा. 

२. एका पॅनमधे दोन चमचे तूप गरम करून त्यावर ओट्स थोडे परतून घ्यावेत.

३. एका मोठ्या तसराळ्यात किंवा परातीत लोणी व साखर एकत्र करून घ्यावे. त्यामधे कणीक, ओट्स, मीठ, बेकिंग पावडर, जायफळ/वेलदोडा/लवंग/दालचिनी यापैकी आवडीनुसार दोन-तीन पुडी घालाव्यात. त्यातच बदामाचे काप किंवा जाडसर पूड घालून मिश्रण एकत्र करावे. हे मिश्रण मिळून येण्यासाठी लागेल तसे थोडे दूध घालून पीठ मळून घ्यावे. 

४. तयार झालेल्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून, तळहातावर दाबून कुकीज ना आकार द्यावा. 

५.  गरम ओव्हनमधे १८०° फॅरनहाइटवर कुकीज १२-१५ मिनिटे भाजून घ्याव्यात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चमचमीत चकली!

शेपूची फळं!

आमटीचा गोडा मसाला (ब्राह्मणी)