जिंजर बिस्किटे
साहित्य :-
१. कणीक/मैदा - ३०० ग्रॅम
२. पिठी साखर :-१५० ग्रॅम्स
३. लोणी:-१५० ग्रॅम्स
४. सुंठ:- चहाचे दोन चमचे
५. बेकिंग ंपावडर-१ चमचा
६.मीठ :- पाव चमचा
कृती:-
१.लोणी व साखर फेटून घ्यावे
२. फेटलेल्या मिश्रणात कणीक, बेकिंग पावडर, मीठ व सुंठ घालून सर्व एकत्र मळून घ्या.
३.गोळा एकत्र होण्यासाठी आवश्यक तेव्हडे, पण कमीतकमी दूध घालून गोळा घट्ट मळून घ्या.
४.या गोळ्याची जाडसर पोळी लाटून त्यावर काट्याने टोचून घ्या.
५.आपल्याला हव्या त्या आकारात बिस्किटे कापून, ओव्हनमधे २००° फॅरनहाइटवर दहा-बारा मिनिटे भाजून घ्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा