ज्वारीच्या पिठाचा खाकरा

साहित्य:-
१. ज्वारीचे पीठ १ वाटी
२. पाणी पाऊण वाटी
 ३.मीठ
४. कसुरी मेथी
५. हळद
६. तिळ


कृती

१. पाऊण वाटी पाणी उकळायला ठेवले. त्यात मीठ, हळद, मसाले, कसुरी मेथी आणि थोडे तीळ घातले. 

२. उकळत्या पाण्यात ज्वारीचे एक वाटी पीठ घालून घोटले. लगेच गॅस बंद करून पीठ खूप छान मळून घेतले

३. पिठाचा गोळा पातळ लाटला आणि एका झाकणाने सारख्या आकाराचे खाकरे कापून घेतले

४. खाकरे तव्यावर हलके भाजून घेऊन बाजूला काढले. 

५. त्यानंतर ब्रश प्रत्येक खाकऱ्याला हलके तेल लावून घेतले.

६. तेल लावलेले काही खाकरे पुन्हा गरम तव्यावर दाबून शेकले. काही मायक्रोवेव्हमधे २ मिनिटे ठेवून भाजले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेपूची फळं!

छोले क्रॅकर्स

बिनअंड्याचा लुसलुशीत केक!