ह्म्मस टिक्की

साहित्य:-
१. उकडलेले छोले १ वाटी 
२. ताहिनी १ चमचा
३. मीठ १/४ चमचा
४. लसूण, मिरची, कोथिंबीर यांचे वाटण १/२ चमचा
५. चिली फ्लेक्स, 
६. ऑलीव्ह ऑईल :-  १ चमचा
७. लिंबाचा रस १/२ चमचा
८. बेसन/मसूर डाळीचे पीठ/रवा/तांदळचे
 पीठ अंदाजे पाव चमचा
९. गरम मसाला:- १/२ चमचा
१०. बेकिंग पावडर १/८ चमचा

कृती:-
उकडलेले छोले मिक्सरवर अथवा ठेचून घेऊन बारीक करून घ्यावेत. त्यात ईतर  सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्यावे. त्या पिठाच्या छोट्या टिक्क्या करून त्यांना वरून थोडे तेल लावावे /स्प्रे करावे. एयरफ्रायर मधे ठेवून टिक्क्या १८०° सेंटिग्रेडला २० मिनिटे भाजून घ्याव्यात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेपूची फळं!

छोले क्रॅकर्स

ग्रीक योगर्ट क्रॅकर्स!