ज्वारी आणि मसुराच्या पिठाचा ब्रेड
ज्वारी आणि मसुराच्या पिठाचा ब्रेड
साहित्य:-
१. ज्वारीचे पीठ :- १ वाटी (~ १५० ग्रॅम)
२. मसूराचे पीठ:- १/४ वाटी (~५० ग्रॅम्स)
३. मीठ-मसाला :- चिली फ्लेक्स, मिक्स्ड इटालियन हर्बस्, लसूणपूड, काळी मिरी पूड, मीठ.. अंदाजे दोन चमचे
४. चिया सीडस् आणि जवस:प्रत्येकी १/२ चमचा, मिक्सरवर जाडसर पूड करून.
५. इसबगोल:- दोन चहाचे चमचे
६. इन्स्टंट यीस्ट:- १/२ चहाचा चमचा
७. पीठ भिजवण्यासाठी दूध
८. ऑलिव्ह ऑईल :-.२ चहाचे चमचे
९. साखर:- १ चमचा
कृती:-
१. दोन्ही पिठे, मीठ-मसाला, सीड्स, साखर व यीस्ट व इसबगोल एकत्र करून कोमट दुधामधे भिजवून व मळून तासभर झाकून ठेवले.
२. तासाभराने फुललेले पीठ परत मळून घेतले व वरून ऑलिव्ह ऑईल लावून परत अर्धा तास झाकून ठेवले.
३. केक टिनला आतून तेल लावून घेतले.
४. पिठाचा गोळा टिनमधे घालून पुन्हा झाकून अर्धा तास ठेवून दिला.
५. एयर फ्रायरमधे १८०°ला २० मिनिटे ब्रेड भाजून घेतला.
क्रिमी डिप:-
१. चीझ क्यूब १
२. काजू :- ७-८
३. हिरवी मिरची:-१
४. कोथिंबीर :- पाववाटी.
५. दही:- १/२ वाटी
६. लसूण पूड १/४ चमचा
७. मीठ:- १/४ चमचा
८. साखर:-१/४ चमचा
वरील सगळे पदार्थ मिक्सरवर बारीक करून घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा