नाचणीची बिस्किटे
साहित्य
१. नाचणीचे पीठ १ कप
२. साजूक तूप १/२ कप
३. पिठी साखर १/२ कप किंवा चिरलेला गूळ १/२ कपाला जरा कमी
४.बेकिंग पावडर - १ चमचा
४. मीठ, वेलची, जायफळ आणि दालचिनी पूड प्रत्येकी पाव चमचा.
५. दूध- चार ते पाच चमचे.
कृती
वर दिलेले सगळे पदार्थ एकत्र केले. पीठ एकत्र मळून येण्यासाठी अगदी आवश्यक तितके दूध घातले. प्रिहिटेड ओव्हनमधे १८० डिग्री सेंटिग्रेडला २० मिनिटे भाजून घेतली. उत्तम झाली होती.
मी नाचणीचे पीठ चाळून घेत नाही कारण कोंडा निघून जातो.
या बिस्कीटामधे तूप थोडे कमी चालते. म्हणजे१/२ कपा ऐवजी १/३ कप घालता येते. तूप कमी घातल्यास पीठ मळून एकत्र येण्यासाठी दूध जरा जास्त लागते.
गूळ घालून केलेली बिस्किटे जास्त खमंग लागतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा