गुजिया
साहित्य:-
पारीसाठी:-
मैदा १ कप
तूप पाव वाटी
मीठ चिमूटभर
पाणी
सारणासाठी:-
खवा पाव किलो
रवा पाववाटी
पिठी साखर दीड वाटी
सुळे खोबरे कीस १ वाटी
खसखस चार चहाचेर चमचे
बडीशोप १ चहाचा चमचा
बदाम काप पाव वाटी
वेलदोड्याची पुड १ चमचा
कृती :-
पारी:-
मैद्याला तूप लावून घ्यावे. साधारण मूठ वळेल इतपत तूप घालावे. मैद्यात चिमूटभर मीठही घालावे. पाणी घालून मैदा घट्ट भिजवून ठेवावा.
सारण:-
खसखस व बडिशोप भाजून घेऊन पूड करून घ्यावी.
खवा हलका परतून घ्यावा
बदामाचे काप तुपावर परतून घ्यावेत
रवा तुपावर भाजून खाव्यावर घालून ठेवावा
त्यात साखर, सुके खोबरे, खसखस व बडिशोपेची पूड, वेलदोड्याची पूड घालून एकत्र करावे.
मैद्याची जाडसर पारी वाटून त्यात सारण भरावे.
गुजियांना मुरड घालून बंद कराव्यात. मंद आचेवर तेलामधे तळून घ्याव्यात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा