वरईचे सांदण

वरईचे सांदण

साहित्य
१०० ग्रॅम वरईचे तांदूळ (एक छोटी वाटी) 
७५ ग्रॅम साखर (पाऊण वाटी) 
१/२ वाटी दही
१/२ वाटी दूध
१/२ वाटी तूप/लोणी४ 
२ पिकलेली केळी
१ चमचा बेकिंग पावडर 
१/४ चमचा बेकिंग सोडा
१/४ चमचा जायफळाची पूड
चिमूटभर मीठ

कृती
१. वरईचे तांदूळ मिक्सरवरून बारीक करून घ्यावेत. 
२. वरईच्या तांदळच्या  पिठामधे इतर सर्व पदार्थ मिळावेत. 
 ३.एका डब्याला तूप लावून आणि खाली बटरपेपर घालून डबा तयार करून घ्यावा. 
४. तयार केलेल्या डब्यांमधे हे मिश्रण ओतावे. 
५. डबा कुकरमधे अथवा स्टीमरमधे ठेऊन पुडिंग २०-२५ मिनिटे वाफवून घ्यावे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेपूची फळं!

छोले क्रॅकर्स

बिनअंड्याचा लुसलुशीत केक!