पोस्ट्स

जिंजर बिस्किटे

इमेज
साहित्य :- १. कणीक/मैदा - ३०० ग्रॅम २. पिठी साखर :-१५० ग्रॅम्स ३. लोणी:-१५० ग्रॅम्स ४. सुंठ:- चहाचे दोन चमचे ५. बेकिंग ंपावडर-१ चमचा ६.मीठ :- पाव चमचा कृती:- १.लोणी व साखर फेटून घ्यावे २. फेटलेल्या मिश्रणात कणीक, बेकिंग पावडर, मीठ व सुंठ घालून सर्व एकत्र मळून घ्या.  ३.गोळा एकत्र होण्यासाठी आवश्यक तेव्हडे, पण कमीतकमी दूध घालून गोळा घट्ट मळून घ्या.  ४.या गोळ्याची जाडसर पोळी लाटून त्यावर काट्याने टोचून घ्या.  ५.आपल्याला हव्या त्या आकारात बिस्किटे कापून, ओव्हनमधे २००° फॅरनहाइटवर दहा-बारा मिनिटे भाजून घ्या

मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे)

इमेज
  मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे)  साहि त्य:- १. गव्हाचे पीठ १०० ग्रॅम्स २. ज्वारीचे पीठ १०० ग्रॅम्स ३. बेसन १०० ग्रॅमस् ४. कांदा १ ५.कोथिंबीर मूठभर ६. लसूणपाकळ्या ४-६ ७. हिरव्या मिरच्या - ४-५ ८.ओवा१ चमचा ९. जिरे १ चमचा १०. मीठ चवीनुसार ११. तेल ३० ग्रॅम्स १२. तीळ मूठभर १३. बेकिंग पावडर १ चमचा कृती:- १. कांदा, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, मीठ, जिरे, ओवा हे सगळे पदार्थ मिक्सर मधून बारीक करून घेतले.  २. गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन, मीठ आणि तेल एकत्र केले. त्यात वरील वाटलेला मसाला व बेकिंग पावडर घातली. अगदी थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला. ३. पोलपाटावर तीळ घालून त्यावर या गोळ्याची जाडसर पोळी लाटून, एका बाटलीच्या झाकणाने सारख्या आकाराच्या पुऱ्या कापून घेतल्या. ४. प्रिहिटेड ओव्हन मधे (१८०° फॅरनहाइटवर) १०-१२ मिनिटे बेक केली. तळटीप मसाले आपल्याला हवे ते आणि हव्या त्या प्रमाणात कमी-जास्त घालता येतात. बाहेरच्या खाकऱ्यामधे फार जास्त तेल/तूप असते.

ओट्स आणि आमंड्स् कुकीज

इमेज
ओट्स आणि आमंड्स् कुकीज साहित्य:- १. ओट्स १५० ग्रॅम्स २. गव्हाचे पीठ ५० ग्रॅम्स ३. साजूक तूप :- २ चमचे ४. साखर:- १२५ ग्रॅम (कमी गोड हव्या असतील तर १०० ग्रॅम) ५. लोणी:- १०० ग्रॅम ६. बदाम - ३० ते ४० ग्रॅम (आवडीनुसार ५०-६० ग्रॅम्स पर्यंत घालू शकतो)  ७. दूध:- पाव ते अर्धा वाटी. ८. बेकिंग पावडर - १ चमचा ९. आवडीप्रमाणे वेलदोडा, जायफळ, दालचिनी, लवंग, केशर १०. मीठ पाव चमचा कृती १. प्रथम १८०° फॅरनहाइटला ओव्हन गरम करायला ठेवावा.  २. एका पॅनमधे दोन चमचे तूप गरम करून त्यावर ओट्स थोडे परतून घ्यावेत. ३. एका मोठ्या तसराळ्यात किंवा परातीत लोणी व साखर एकत्र करून घ्यावे. त्यामधे कणीक, ओट्स, मीठ, बेकिंग पावडर, जायफळ/वेलदोडा/लवंग/दालचिनी यापैकी आवडीनुसार दोन-तीन पुडी घालाव्यात. त्यातच बदामाचे काप किंवा जाडसर पूड घालून मिश्रण एकत्र करावे. हे मिश्रण मिळून येण्यासाठी लागेल तसे थोडे दूध घालून पीठ मळून घ्यावे.  ४. तयार झालेल्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून, तळहातावर दाबून कुकीज ना आकार द्यावा.  ५.  गरम ओव्हनमधे १८०° फॅरनहाइटवर कुकीज १२-१५ मिनिटे भाजून घ्याव्यात.

घेवर

इमेज
आम्ही नुकतेच जयपूरला लग्नासाठी गेलो होतो. तिथले घेवर प्रसिद्ध असल्याने तिथे घेवर खायची इच्छा होती.पण तिथे होळीनंतर १५ दिवसांनी साजरा होत असलेल्या, आपल्या चित्रगौरीसारखाच 'गणगौर' या सणाच्या निमित्ताने घेवर बनणे सुरू करतात, असे कळले.त्यामुळे जयपूरमधे कुठेही ताजे घेवर मिळाले नाहीत. म्हणून आज घरीच, शुद्ध तुपातले घेवर केले! साहित्य १ तूप :- पाव वाटी (मोहन)  २. दूध:- अर्धा वाटी ३. मैदा :- एक वाटी ४. लिंबाचा रस:- अर्धा चमचा ५. बर्फाचे पाच-सहा खडे ६. तूप:- तळणीसाठी ७.साखर एक वाटी.  ८.बदाम काप कृती १.मोहन म्हणून घेतलेले तूप आणि बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून फिरवावेत .  २. तूप खूप फेटले गेल्यावर पांढरे होते. मग त्यामध्ये  दूध आणि लिंबाचा रस घालावा आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवावे.  ३ . त्यानंतर मैदा व गर पाणी (अंदाजे एक कप) घालून पातळसर पीठ करून घ्यावे घेतले.  ४. कढईत तळणीसाठी तूप चांगले तापवावे. त्यात पळीने थोडे थोडे करत वरील मिश्रण घालून घेवर तयार करून घ्यावेत.  ५. लालसर रंगावर घेवर तळून झाल्यावर , हलक्या हाताने घेवर बाहेर काढून घेऊन त्यातील तूप निथळायला ठेवावे....

नाचणीची बिस्किटे

इमेज
साहित्य १. नाचणीचे पीठ १ कप २. साजूक तूप १/२ कप ३. पिठी साखर १/२ कप किंवा चिरलेला गूळ १/२ कपाला जरा कमी ४.बेकिंग पावडर - १ चमचा ४. मीठ, वेलची, जायफळ आणि  दालचिनी पूड प्रत्येकी पाव चमचा. ५. दूध- चार ते पाच चमचे. कृती  वर दिलेले सगळे पदार्थ एकत्र केले. पीठ एकत्र मळून येण्यासाठी अगदी आवश्यक तितके दूध घातले. प्रिहिटेड ओव्हनमधे १८० डिग्री सेंटिग्रेडला २० मिनिटे भाजून घेतली. उत्तम झाली होती.  मी नाचणीचे पीठ चाळून घेत नाही कारण कोंडा निघून जातो. या बिस्कीटामधे तूप थोडे कमी चालते. म्हणजे१/२ कपा ऐवजी १/३ कप घालता येते. तूप कमी घातल्यास पीठ मळून एकत्र येण्यासाठी दूध जरा जास्त लागते. गूळ घालून केलेली बिस्किटे जास्त खमंग लागतात. 

मटणाचा तांबडा रस्सा

इमेज
सोलापूरच्या सौ. शालिनी चितारी काकूंच्या डब्यातला अजून एक चविष्ट पदार्थ म्हणजे, 'मटणाचा तांबडा रस्सा'! गेली कमीतकमी पन्नास वर्षे, अनेक रविवारी, आम्ही काकूंच्या हातच्या मटण चॉप्स आणि मटणाचा रस्सा असलेल्या डब्याचा आस्वाद घेत आहोत. मुरलीधर चितारी काका, दुपारी एक-दीडच्या सुमारास आम्हाला चार पुडी डबा आणून द्यायचे. आषाढातल्या रविवारी तर आमच्यासाठी खास डबा घेऊन यायचेच.  त्या डब्याला दृष्ट लागू नये म्हणून नेहमीच त्यात  कोळशाच्या एक तुकडा ठेवलेला असायचा. खरोखरच दृष्ट लागण्यासारखे लाजबाब पदार्थ त्यात असायचे. एका डब्यात मटण चॉप्स, एका डब्यात 'मटणाचा तांबडा रस्सा' आणि दोन डब्यांत त्याच्याकडचा खास मसाल्याचा हलका वास असलेला मऊ, मोकळा भात!  आता काकूंचे वय झाले असले तरीही अजूनही त्या उत्साही आहेत. काकूंची सून सौ राजेश्री चितारी, त्यांचा वारसा चालवत आहे. राजेश्रीनेच मला काकूंच्या मटण ग्रीन चॉप्सची आणि मटणाच्या तांबडा रस्स्याची कृती लिहून पाठवली आहे.  तुम्हीही या पदार्थाचा आस्वाद घ्या.   साहित्य :- १. मटण :- १ किलो  २. कांदे:- ६ ते ७ ३. सुके...

मटण ग्रीन चॉप्स

इमेज
आजपर्यंत मी खाल्लेल्या मटण चॉप्स पैकी सगळ्यात उत्तम चॉप्स हे सोलापूरच्या सौ शालिनी चितारी काकूंच्या हातचे आहेत. काकूंचे सगळेच खाद्यपदार्थ उत्तम होतात. पण मटण चॉप्स आणि मटणाचा तांबडा रस्सा त्या विशेष चांगला करतात.   काकूंचे माहेर पुण्यातल्या कॅम्प भागात राहणाऱ्या नरलांकडचे. हे पदार्थ करायला त्या त्यांच्या आईकडून शिकल्या , असे काकू सांगतात.  गेली अनेक वर्षे काकू आम्हाला अगदी प्रेमाने हे पदार्थ खायला घालत आहेत.  तुम्हीही काकूंच्या प्रमाणाने हे मटण चॉप्स करून बघा! साहित्य :- १. मटन चॉप्स:- १ किलो  २. ओला नारळ:- १ मोठा  ३. कोथिंबीर:- अर्धा वाटी  ४. हिरव्या मिरच्या :-१० ते १२ ५. आले :- ३ इंच  ६. लसूण पाकळ्या :-१५ ते २० .  ७. काजू बदाम पेस्ट:- सात-आठ काजू व बदामाची पेस्ट   ८ गरम मसाला :- मिरे -१०, लवंग-४, वेलदोडे-७ ते ८, दालचिनी तुकडे-७ ते ८  ९. तेल:- तीन मोठे चमचे  १०. मीठ:- चवीनुसार  ११. हळद:-पाव चमचा   कृती :- ओला नारळ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची असे हिरवे वाटण करून घ्यावे. आले आणि लसूण एक...