पोस्ट्स

चमचमीत चकली!

इमेज
कमला नेहरू रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातल्या सारिका मावशींनी एकदा चहाबरोबर चकलीचा डबाही माझ्यासमोर ठेवला. त्या चकल्या सुधा नाईक सिस्टरांनी स्वहस्ते बनवून आणल्या होत्या, हेही समजले. चकलीचा पहिला तुकडा तोंडात घातला आणि लक्षात आलं की आपल्या उभ्या आयुष्यात खाल्लेल्या अनेक उत्तम चमचमीत चकल्यांपैकी, ही एक चकली आहे. माझ्या कुसुमआत्याच्या हातच्या चकल्याही अशाच खमंग असायच्या.  मी लगेच नाईक सिस्टरांकडून त्यांचे चकलीच्या भाजणीचे प्रमाण लिहून घेतले. भाजणीचे प्रमाण ४ वाट्या तांदूळ २ वाट्या हरभरा डाळ १/२ वाटी मूग डाळ १/४ वाटी उडीद डाळ १/४ वाटी जाड पोहे १/४ वाटी साबुदाणा २ चमचे ओवा २ चमचे जिरे २चमचे धने तांदूळ, सर्व डाळी, पोहे व साबुदाणा हे सर्व मंद आचेवर, पण तांबूस रंग येईपर्यंत, वेगवेगळे भाजून घ्यावे. तसेच धने, जिरे व ओवाही भाजून घ्यावे. हे सर्व पदार्थ थंड झाल्यावर दळून आणावेत.  चकली करताना वरील प्रमाणातल्या भाजणीला, ३/४ वाटी कडकडीत तापवलेले गोडेतेलाचे मोहन घालावे. चकलीची भाजणी परातीत घेऊन, त्यात खळे करावे. भाजणीच्या या खळ्यांत उकळते पाणी घालावे. त्यात हाताने भाजणी ढक...

सोलापुरी शेंगा-पोळया

इमेज
एक किलो शेंगदाणे  तीन पाव गूळ  अर्धा ते एक छटाक सुंठ  अर्धा ते एक छटाक वेलदोडे  एक छटाक बडीशोप  शेंगदाणे भाजून घ्यावेत व त्यांच  साले काढून घ्यावीत . शेंगदाणे व गूूळ एकत्र करून ते मिक्सरला वाटून घ्यावेत. नंतर त्यात सुंठ, वेलदोडा आणि बडिशोपेची पूड करून घालावी.  गव्हची कणिक सध्या पोळ्याच्या कणकेसारखीच भिजवून घ्यावी. कणकेच्या पारीच्या आकाराचा सारणाचा उंडा घेऊन, तो भरून पोळी जरा जाडसर लाटावी. गरम तव्यावर तूप सोडून पोळ्या भाजून घ्याव्यात. या पोळ्या सोलापुरात संक्रांतीच्या वेळी करतात. घट्ट साजूक तुपाबरोबर खायला मजा येते.  पुण्यात माझ्या घरी, काही वर्षांपूर्वी, रूपाली नावाची एक सोलापूरकर मोलकरीण कामाला होती. तिच्या कडून मी या पोळ्या करायला शिकले. 

शेपूची फळे!

ज्वारीच्या पिठात लसूण,तिखट,मीठ,हळद घालून भिजवून त्याचे छोटे,चपटे गोळे करून घ्यावेत.पातेल्यामधे पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवावी.चाळणीला तेल लावून त्यावर पसरून ज्वारीचे चपटे गोल ठेवावे...त्यावर बारीक चिरलेला शेपू पसरुन घालावा...परत १ थर ज्वारीच्या फळांचा ठेवून परत शेपू पसरून घालावा व २० मि..चांगले वाफवून घ्यावे... शेपूची भाजी फळांना छान चिटकते...नंतर वरून फोडणी घालावी...छान लागतात.

रसगुल्ले

इमेज
रसगुल्ले, रसमलाई, अंगूरमलाई, हे पदार्थ गेली अनेक वर्षे मी घरी करत आले आहे. ते  मला जमत होते पण अगदी उत्तम बनत नव्हते. त्यामुळे कोणी पाहुणे जेवायला येणार असले आणि जेवणाच्या बेतामधे रसगुल्ले, रसमलाई, अंगूरमलाई यापैकी काही गोड पदार्थ ठरला, तर तो मी बाहेरूनच विकत आणायचे.  मागच्या आठवड्यात, अनिता वर्मा या माझ्या पाककलानिपुण मैत्रिणीने केलेल्या रसगुल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने आमच्या ग्रुपवर पाठवले होते. ते बघितल्यावर लगेच, मी फोनवर अनिताला या पाककृतीचे 'राझ' विचारले. तिने दिलेल्या कृतीप्रमाणे रसमलाई मी करून बघितली. प्रथमच अगदी उत्तम जमल्यामुळे,मी भलतीच खूश झालेय. ती पाककृती आज माझ्या ब्लॉगवर टाकतेय. रसगुल्ल्याचा फोटो आणि व्हिडीओ मात्र मी अनिताकडूनच मागून घेतला आहे. Thanks Anita!  साहित्य:- गायीचे दूध- १ लिटर लिंबाचा रस किंवा  पांढरे व्हिनेगार किंवा सायट्रिक ऍसिड  साखर दीड कप (३०० ग्राम) कृती:- गायीचे दूध पातेल्यात तापवायला ठेवावे. तापत असताना ते सतत ढवळत राहावे. त्यामुळे त्यावर साय धरत नाही. रसगुल्ले व इतर बंगाली मि...

सोनेरी जवस, खसखस व लिंबाचा केक

इमेज
पुणे महानगरपालिकेच्या सोनावणे हॉस्पिटलमधल्या, डॉक्टर अनिता भोसले,  या बालरोगततज्ज्ञ मैत्रिणीने मला त्यांच्या बागेतली, ताजी पिवळी धमक लिंबे दिली होती. त्या लिंबाच्या वासामुळे, मला  Lemon-Poppyseed  केक करायचा मोह झाला.  आम्ही २०१६ साली बर्लिनला गेलो होते. त्यावेळी माझा मुलगा अनिरुद्ध तिथे एम. एस. करत होता. त्याच्याकडे एक मोठी बाटली भरून जांभळ्या रंगाची खसखस होती. मी जांभळी खसखस प्रथमच बघत होते. माझी मुलगी, असिलता, त्याच्याकडे  बर्लिनला आलेली असताना, त्या दोघांनी Lemon-poppy seed केक केला होता. त्यातली खसखस उरलेली होती. मीही लगेच तो केक करून बघितला. पिवळट रंगाच्या केकमध्ये जांभळ्या रंगाची खसखस फारच सुरेख दिसते. या केकची चवही विशेष चांगली लागते. पुढेही एक-दोन वेळा जर्मनीहून मी ती जांभळी खसखस मागवून घेतली आणि केक, मोदक तसेच इतर पदार्थांत वापरली.  त्याच केकचा, मैद्याऐवजी कणीक वापरून जरासा वेगळा प्रकार मी करून बघितला. सध्या माझ्याकडे ती जांभळी खसखस नाही. त्यामुळे आपली नेहमीचीच पांढरी खसखस मी वापरलीय. पण माझ्य...

कुडाळ देशकर पद्धतीची माशाची आमटी

इमेज
माझ्या आठवणीत, मासळीचा सगळ्यात चवदार रस्सा, १९८६ सालच्या डिसेंबर महिन्यांतली आहे. आमच्या लग्नानंतर ,मी आणि आनंद गोव्याला गेलो होतो. आनंदचे धाकटे मामा, बाबूमामा जोशी त्यावेळी गोव्यात राहत होते. बाबूमामांची बायको, म्हणजे आमच्या अलका मामी, माहेरच्या तेंडुलकर, म्हणजे कुडाळ देशकर आद्य गौड सारस्वत ब्राम्हण आहेत. मामींनी आम्हाला त्यांच्या माहेरच्या पद्धतीची माशाची आमटी खायला घातली होती. त्याची चव मी कधीही विसरणार नाही. अलका मामींना विचारून त्यांची ती पाककृती आज माझ्या ब्लॉगवर टाकते आहे.  साहित्य:- मासे:- बांगडा, पापलेट, सारंग, इसवण, यापैकी एखाद्या प्रकारच्या माशाचे पाच-सहा माध्यम आकाराचे तुकडे   मीठ- चवीनुसार  १ मोठ्ठ्या ओल्या नारळाचे खवलेले खोबरे (दोन वाट्या भरून खोबरे)   चिंच कोळासाठी- दोन चमचे कोळ  धने-एक ते दीड चमचा   १ कांदा- बारीक चिरून लाल तिखट- १ चमचा भरून   मिरे;- ५ ते ६   लाल तिखट  हळद- अर्धा चमचा  तांदुळाची पिठी- अर्धा चमचा  साजूक तूप/खोबऱ्याचे तेल- एक चमचा  कृती:-...

कणीक-बदामपुडीचा केक!

इमेज
माझे अमेरिकास्थित भाऊ-वहिनी, दरवेळेस येताना माझ्या आई-वडिलांसाठी तिकडे मिळणारे आमंड मील (सालं काढलेल्या बदामाची रवाळ पूड) घेऊन येतात.सध्या ते वापरून मी वेगवेगळे पदार्थ त करून बघते आहे. परवा सकाळी सकाळी साय घुसळून लोणी काढले. ते बघून मला केक करायची हुक्की आली. पण घरात मैदा-रवा काहीच नव्हते.म्हणून कणिक आणि आमंड मील वापरून केक केला. हा केक माझ्या अंदाजाने प्रमाण घेऊन केला. तो खूपच चांगला झाला म्हणून सहज माझ्या मुलीला, असिलताला व्हिडीओ कॉल वर दाखवला. या केकला whole wheat-almond pound cake म्हणतात असे तिने मला सांगितले. त्यांनतर इंटरनेटवरच्या पाककृती बघितल्या. तिथे अनेक वेगवेगळ्या रेसिपीज आहेत.  मला अगदी रोजचा स्वयंपाक करतानाही सगळेच पदार्थ वजन करून घ्यायची सवय आहे. एकप्रकारचा चाळाच आहे म्हणा ना! त्यामुळे नेमकी पाककृती मला देता येतेय.   साहित्य :- ४ अंडी २०० ग्रॅम घरचे पांढरे लोणी २०० ग्रॅम साखर १५० ग्रॅम कणीक ७५ ग्रॅम आमंड मील (बदामाची रवाळ पूड)  चिमुटभर मीठ १ चमचा केशर इसेन्स १ चमचा बेकिंग पावडर  कृती:- कुकरच्या डब्याला तूप लावून घेतले...