तीळगुळाचा केक!

काल संक्रात असूनही तीळ आणि गूळाचे काहीच केले नाही. म्हणून आज तीळ आणि गूळ वापरून केक केला.




साहित्य :-

१.लोणी २०० ग्रॅम
२.गूळ २०० ग्रॅम
३. नाचणीचे पीठ २०० ग्रॅम
४.दूध १/२ कप (१०० मिली)
५. तीळ २५ ग्रॅम (अंदाजे) 
६.बेकिंग पावडर - १ चमचा(५ ग्रॅम)
७.चिमूटभर मीठ
८.जायफळाची पूड १/२ चमचा

कृती;-
लोणी, गूळ आणि दूध एकत्र करून फेटून घेतले.  त्यात हळूहळू 
नाचणीचे पीठ, तीळ,बेकिंग पावडर, मीठ व जायफळाची पूड घालून पीठ एकत्र केले. हे करत असताना एकीकडे कुकर गॅसवर ठेऊन गरम करून घेतला होता. 

एका कुकरच्या डब्याला आतून तूप लावून घेतले. त्यावर नाचणीचे पीठ भुरभुरले . केकचे तयार केलेले मिश्रण या डब्यात ओतले.  

गरम कुकरमधे तो डबा ठेवून, साधारण ५०-५५ मिनिटे केक भाजून घेतला. 

टिप्पण्या

  1. स्वाती, छान पाककृती!
    गुळाचा वापर केकमध्ये . आरोग्यदृष्ट्या उत्तमच.

    उत्तर द्याहटवा
  2. फार च सुंदर. एकदम न्युट्रिटिव्ह आणि कल्पक पाककृती.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चमचमीत चकली!

शेपूची फळं!

आमटीचा गोडा मसाला (ब्राह्मणी)