तीळगुळाचा केक!
काल संक्रात असूनही तीळ आणि गूळाचे काहीच केले नाही. म्हणून आज तीळ आणि गूळ वापरून केक केला.
साहित्य :-
१.लोणी २०० ग्रॅम
२.गूळ २०० ग्रॅम
३. नाचणीचे पीठ २०० ग्रॅम
४.दूध १/२ कप (१०० मिली)
५. तीळ २५ ग्रॅम (अंदाजे)
६.बेकिंग पावडर - १ चमचा(५ ग्रॅम)
७.चिमूटभर मीठ
८.जायफळाची पूड १/२ चमचा
कृती;-
लोणी, गूळ आणि दूध एकत्र करून फेटून घेतले. त्यात हळूहळू
नाचणीचे पीठ, तीळ,बेकिंग पावडर, मीठ व जायफळाची पूड घालून पीठ एकत्र केले. हे करत असताना एकीकडे कुकर गॅसवर ठेऊन गरम करून घेतला होता.
एका कुकरच्या डब्याला आतून तूप लावून घेतले. त्यावर नाचणीचे पीठ भुरभुरले . केकचे तयार केलेले मिश्रण या डब्यात ओतले.
गरम कुकरमधे तो डबा ठेवून, साधारण ५०-५५ मिनिटे केक भाजून घेतला.
मी लूक वरून guess केले
उत्तर द्याहटवाnew look!
उत्तर द्याहटवास्वाती, छान पाककृती!
उत्तर द्याहटवागुळाचा वापर केकमध्ये . आरोग्यदृष्ट्या उत्तमच.
धन्यवाद अनुराधा!
उत्तर द्याहटवाफार च सुंदर. एकदम न्युट्रिटिव्ह आणि कल्पक पाककृती.
उत्तर द्याहटवाखूप छान काहीं तरी वेगळं
उत्तर द्याहटवा