पोस्ट्स

वेगळ्या रूपातील, ताकातली सांडगी मिरची

इमेज
आमच्या साहवर्धन समूहाच्या सदस्य असलेल्या सौ मेदिनी अभ्यंकर यांनी वेगळ्या रूपातील सांडगी मिरची केली. सहज प्रयोग म्हणून त्यांनी सांडगी मिरच्यांच्या उरलेल्या मसाल्यात, फूड प्रोसेसेरमधून बारीक करून घेतलेल्या मिरच्या घातल्या. त्यानंतर ते मिश्रण  कडकडीत उन्हात वाळवले. तो प्रयोग यशस्वी झाला.  बरेचदा आपण अख्खी सांडगी मिरची, एखाद्या पदार्थात घातली की अनेक लोक ती मिरची बाहेर काढून टाकतात आणि फक्त आतला मसाला  खातात. त्यामुळे मिरची वाया जाते.  यावर,  मेदिनीताईंनी काढलेला, मिरच्या चुरून वापरण्याचा, हा उपाय मला फारच चांगला वाटला . या मिरच्यांची कृती वाचून माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि मी त्यांची परवानगी घेऊन इथे लिहली.  मेदिनीताईंची आणि माझी अजून प्रत्यक्ष भेट झालेली नाही पण आमची मैत्री अशा या खमंग पदार्थाच्या निमित्ताने झाली हे विशेष! साहित्य;- १.  धने -१०० ग्रॅम  २. मेथ्या किंवा मेथी दाणे- १०० ग्रॅम  ३. मीठ -३ चमचे  ४. हळद-२ चमचे  ५. हिंग पूड- १ चमचा  ६. आंबट ताक- दीड वाटी  ७. तिखट हिरव्या मिरच्या-२५...

आईची कणकेची बिस्किटे

इमेज
हे प्रमाण माझ्या आईचे आहे का आजीचे आहे हे सांगणे अवघड आहे. आमच्या घरी एक अगदी जुने पत्र्याचे बिस्कीटपात्र  होते. त्यात आई-आजी कणकेची बिस्किटे करताना मी पाहिलेले आहे. त्या बिस्कीटपत्रातल्या कप्प्याच्या खाली- वर निखारे ठेऊन भाजलेल्या बिस्किटांना एक धुरकट, खमंग वास असायचा. आमच्या घरी बिस्किटे कापण्यासाठी एक साचा होता. आईच्या हाताखाली लुडबुड करत, बिस्किटे कापायला मदत करायला मजा यायची. नंतर आम्ही मुले मोठी झालो आणि घरांत एकाचवेळी, वाढत्या वयाची सात भावंडे झाल्यावर मात्र, आई-काकू, दिवेकर बेकरीत  सर्व सामान देऊन, तिथून बिस्किटे भाजून आणायच्या. ही बिस्किटे खूपच हलकी होतात आणि दुधात किंवा चहांत बुडवली की  छान मऊ होतात, पण विरघळत नाहीत. आता तो माझ्या माहेरच्या घरातील बिस्किटाचा साचा माझ्याकडे नाही नाही. त्यामुळे इंटरनेटवरचा फोटो टाकला आहे.    साहित्य  १.  कणीक १ किलो  २. पिठीसाखर  १/२ किलो (मी मोरसही घेते.) ३. पांढरे लोणी १/४ किलो  ४. खाण्याचा सोडा २चमचे  ५. अमोनिया ५चमचे ६.  मी...

तीळगुळाचा केक!

इमेज
काल संक्रात असूनही तीळ आणि गूळाचे काहीच केले नाही. म्हणून आज तीळ आणि गूळ वापरून केक केला. साहित्य :- १.लोणी २०० ग्रॅम २.गूळ २०० ग्रॅम ३. नाचणीचे पीठ २०० ग्रॅम ४.दूध १/२ कप (१०० मिली) ५. तीळ २५ ग्रॅम (अंदाजे)  ६.बेकिंग पावडर - १ चमचा(५ ग्रॅम) ७.चिमूटभर मीठ ८.जायफळाची पूड १/२ चमचा कृती;- लोणी, गूळ आणि दूध एकत्र करून फेटून घेतले.  त्यात हळूहळू  नाचणीचे पीठ, तीळ,बेकिंग पावडर, मीठ व जायफळाची पूड घालून पीठ एकत्र केले. हे करत असताना एकीकडे कुकर गॅसवर ठेऊन गरम करून घेतला होता.  एका कुकरच्या डब्याला आतून तूप लावून घेतले. त्यावर नाचणीचे पीठ भुरभुरले . केकचे तयार केलेले मिश्रण या डब्यात ओतले.   गरम कुकरमधे तो डबा ठेवून, साधारण ५०-५५ मिनिटे केक भाजून घेतला. 

चमचमीत चकली!

इमेज
कमला नेहरू रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातल्या सारिका मावशींनी एकदा चहाबरोबर चकलीचा डबाही माझ्यासमोर ठेवला. त्या चकल्या सुधा नाईक सिस्टरांनी स्वहस्ते बनवून आणल्या होत्या, हेही समजले. चकलीचा पहिला तुकडा तोंडात घातला आणि लक्षात आलं की आपल्या उभ्या आयुष्यात खाल्लेल्या अनेक उत्तम चमचमीत चकल्यांपैकी, ही एक चकली आहे. माझ्या कुसुमआत्याच्या हातच्या चकल्याही अशाच खमंग असायच्या.  मी लगेच नाईक सिस्टरांकडून त्यांचे चकलीच्या भाजणीचे प्रमाण लिहून घेतले. भाजणीचे प्रमाण ४ वाट्या तांदूळ २ वाट्या हरभरा डाळ १/२ वाटी मूग डाळ १/४ वाटी उडीद डाळ १/४ वाटी जाड पोहे १/४ वाटी साबुदाणा २ चमचे ओवा २ चमचे जिरे २चमचे धने तांदूळ, सर्व डाळी, पोहे व साबुदाणा हे सर्व मंद आचेवर, पण तांबूस रंग येईपर्यंत, वेगवेगळे भाजून घ्यावे. तसेच धने, जिरे व ओवाही भाजून घ्यावे. हे सर्व पदार्थ थंड झाल्यावर दळून आणावेत.  चकली करताना वरील प्रमाणातल्या भाजणीला, ३/४ वाटी कडकडीत तापवलेले गोडेतेलाचे मोहन घालावे. चकलीची भाजणी परातीत घेऊन, त्यात खळे करावे. भाजणीच्या या खळ्यांत उकळते पाणी घालावे. त्यात हाताने भाजणी ढक...

सोलापुरी शेंगा-पोळया

इमेज
एक किलो शेंगदाणे  तीन पाव गूळ  अर्धा ते एक छटाक सुंठ  अर्धा ते एक छटाक वेलदोडे  एक छटाक बडीशोप  शेंगदाणे भाजून घ्यावेत व त्यांच  साले काढून घ्यावीत . शेंगदाणे व गूूळ एकत्र करून ते मिक्सरला वाटून घ्यावेत. नंतर त्यात सुंठ, वेलदोडा आणि बडिशोपेची पूड करून घालावी.  गव्हची कणिक सध्या पोळ्याच्या कणकेसारखीच भिजवून घ्यावी. कणकेच्या पारीच्या आकाराचा सारणाचा उंडा घेऊन, तो भरून पोळी जरा जाडसर लाटावी. गरम तव्यावर तूप सोडून पोळ्या भाजून घ्याव्यात. या पोळ्या सोलापुरात संक्रांतीच्या वेळी करतात. घट्ट साजूक तुपाबरोबर खायला मजा येते.  पुण्यात माझ्या घरी, काही वर्षांपूर्वी, रूपाली नावाची एक सोलापूरकर मोलकरीण कामाला होती. तिच्या कडून मी या पोळ्या करायला शिकले. 

शेपूची फळे!

ज्वारीच्या पिठात लसूण,तिखट,मीठ,हळद घालून भिजवून त्याचे छोटे,चपटे गोळे करून घ्यावेत.पातेल्यामधे पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवावी.चाळणीला तेल लावून त्यावर पसरून ज्वारीचे चपटे गोल ठेवावे...त्यावर बारीक चिरलेला शेपू पसरुन घालावा...परत १ थर ज्वारीच्या फळांचा ठेवून परत शेपू पसरून घालावा व २० मि..चांगले वाफवून घ्यावे... शेपूची भाजी फळांना छान चिटकते...नंतर वरून फोडणी घालावी...छान लागतात.

रसगुल्ले

इमेज
रसगुल्ले, रसमलाई, अंगूरमलाई, हे पदार्थ गेली अनेक वर्षे मी घरी करत आले आहे. ते  मला जमत होते पण अगदी उत्तम बनत नव्हते. त्यामुळे कोणी पाहुणे जेवायला येणार असले आणि जेवणाच्या बेतामधे रसगुल्ले, रसमलाई, अंगूरमलाई यापैकी काही गोड पदार्थ ठरला, तर तो मी बाहेरूनच विकत आणायचे.  मागच्या आठवड्यात, अनिता वर्मा या माझ्या पाककलानिपुण मैत्रिणीने केलेल्या रसगुल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने आमच्या ग्रुपवर पाठवले होते. ते बघितल्यावर लगेच, मी फोनवर अनिताला या पाककृतीचे 'राझ' विचारले. तिने दिलेल्या कृतीप्रमाणे रसमलाई मी करून बघितली. प्रथमच अगदी उत्तम जमल्यामुळे,मी भलतीच खूश झालेय. ती पाककृती आज माझ्या ब्लॉगवर टाकतेय. रसगुल्ल्याचा फोटो आणि व्हिडीओ मात्र मी अनिताकडूनच मागून घेतला आहे. Thanks Anita!  साहित्य:- गायीचे दूध- १ लिटर लिंबाचा रस किंवा  पांढरे व्हिनेगार किंवा सायट्रिक ऍसिड  साखर दीड कप (३०० ग्राम) कृती:- गायीचे दूध पातेल्यात तापवायला ठेवावे. तापत असताना ते सतत ढवळत राहावे. त्यामुळे त्यावर साय धरत नाही. रसगुल्ले व इतर बंगाली मि...