पोस्ट्स

साटोऱ्या

फेसबुकवरच्या आमच्या  'खादाड खाऊ' ग्रुपचे सदस्य राजीव कुलकर्णीं यांनी नुकतीच एक हळहळ ग्रूपवर व्यक्त केली. कुणीतरी ऑफर केलेल्या साटोरीला 'नको' म्हणण्याची चूक त्यांच्याकडून घडली! काहींनी त्यांच्या दुःखावर फुंकर घातली तर काहींनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.एकुणात काय  ग्रुपवर साटोरीवरच चर्चा सुरू झाली. मग ग्रुपवरील तनया जी एम ने मला सटोरीची पाककृती देण्याचा लाडिक आग्रह केला. म्हणून माझी पाककृतींची वही उघडून माझ्या आईने शिकवलेली साटोरीची कृती लिहून काढली. सारण:- खवा पाव किलो. (२५० ग्रॅम), बारीक रवा पाव वाटी (चार टेबलस्पून) तुपावर तांबूस भाजून घ्यावा. रवा गरम असतानाच दुधाचा हबका मारून घ्यावा. हा रवा आणि खवा मिसळून घ्यावा. खव्याच्या इतकीच पिठीसाखर त्यात मिसळावी. यामध्ये भाजलेल्या खसखसीची पूड साधारण पाव वाटी व स्वादासाठी वेलची पूड अथवा जायफळ पूड घालावी. पारी:- आध पाव (१२५ ग्रॅम ) बारीक रवा व  तीन पाव (७५० ग्रॅम ) मैदा एकत्र करावे. त्यात दोन टेबलस्पून साजूक तुपाचे मोहन गरम करून घालावे. चवीपुरते मीठ घालावे. हा रवा-मैदा दुधात( आई ...

दावणगिरी डोसा

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातल्या फिजिओथेरपी कॉलेजच्या लिपिका, नम्रता लांजेकर यांनी मला या डोस्याची  पाककृती दिली. मी ते करून खाल्ले आणि बऱ्याच लोकांना खायला घातले. खूपच छान होतात. तुम्हीही खा आणि खिलवा! साहित्य :- ४ वाट्या तांदूळ १ वाटी पोहे १/२ वाटी साबुदाणा १/२ वाटी उडीद डाळ १/२ चमचा मेथ्या कृती :- वरील साहित्य एकत्र करून पाच तास भिजवून ठेवल्यानंतर मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. वाटलेले पीठ बारा तास झाकून आंबायला ठेवावे.  नंतर त्यात चवीपुरते मीठ घालून त्याचे जाडसर डोसे घालावेत. डोसा घातल्याबरोबर त्यावर झाकण ठेवावे, त्यामुळे तो छान फुलून येतो. उलटून झाकण ना ठेवता डोसा दुसऱ्या बाजूने खरपूस भाजून घ्यावा. आवडीत असल्यास डोसे बनवतानाच त्यावर बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीर घालावे. हे डोसे ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्यावे.  

गूळ पापडीच्या वड्या

इमेज
इतकी  वर्षे, गुळपापडीच्या वड्या मी, नेहमीच माझ्या धाकट्या वहिनीच्या म्हणजे प्राचीच्या, हातच्या  खात आलेले आहे .  मग मध्ये एकदा कृतीपण विचारली! तिने खायला घालायचे बंद केले तरच मी करायला सुरुवात करीन.  पण तुम्ही करून बघा:- साहित्य:- तीन वाट्या कणीक एक वाटी बेसन एक वाटी बारीक डिंक तीन वाटी बारीक चिरलेला गूळ वेलदोड्याची पूड चवीनुसार चिमूटभर मीठ दीड ते दोन वाट्या तूप. पिस्ता,बदाम, काजू व इतर सुका मेवा आवडीप्रमाणे आणि अर्थात ऐपतीप्रमाणे! कृती :- डिंक तुपात तळून फुलवून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा . त्याच तुपात बेसन भाजायला सुरुवात करावी. बेसन थोडावेळ भाजून झाल्यावर, त्यातच कणिक घालून एकत्र खरपूस भाजून घ्यावे . चांगले भाजून झाल्यावर त्यात मीठ, वेलदोड्याची पूड, गूळ व आधी भाजून ठेवलेला डिंक, घालावा व  गॅस लगेच बंद करवा. हे मिश्रण गरम असतानाच चांगले घोटून घ्यावे व तूप लावलेल्या थाळीमध्ये वड्या थापून घ्याव्यात. वड्या थापत असतानाच  वर  काजू-पिस्ता, बदाम व इतर सुका मेवा थापावा. या वड्या शक्...