दावणगिरी डोसा

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातल्या फिजिओथेरपी कॉलेजच्या लिपिका, नम्रता लांजेकर यांनी मला या डोस्याची  पाककृती दिली. मी ते करून खाल्ले आणि बऱ्याच लोकांना खायला घातले. खूपच छान होतात. तुम्हीही खा आणि खिलवा!

साहित्य :-
४ वाट्या तांदूळ
१ वाटी पोहे
१/२ वाटी साबुदाणा
१/२ वाटी उडीद डाळ
१/२ चमचा मेथ्या

कृती :-
वरील साहित्य एकत्र करून पाच तास भिजवून ठेवल्यानंतर मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. वाटलेले पीठ बारा तास झाकून आंबायला ठेवावे.  नंतर त्यात चवीपुरते मीठ घालून त्याचे जाडसर डोसे घालावेत. डोसा घातल्याबरोबर त्यावर झाकण ठेवावे, त्यामुळे तो छान फुलून येतो. उलटून झाकण ना ठेवता डोसा दुसऱ्या बाजूने खरपूस भाजून घ्यावा. आवडीत असल्यास डोसे बनवतानाच त्यावर बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीर घालावे. हे डोसे ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्यावे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पनीर-मटार बेक्ड करंजी

खंबायती हलवासन

नाचणीची बिस्किटे