गूळ पापडीच्या वड्या

इतकी  वर्षे, गुळपापडीच्या वड्या मी, नेहमीच माझ्या धाकट्या वहिनीच्या म्हणजे प्राचीच्या, हातच्या  खात आलेले आहे . 

मग मध्ये एकदा कृतीपण विचारली! तिने खायला घालायचे बंद केले तरच मी करायला सुरुवात करीन.  पण तुम्ही करून बघा:-

साहित्य:-
तीन वाट्या कणीक
एक वाटी बेसन
एक वाटी बारीक डिंक
तीन वाटी बारीक चिरलेला गूळ
वेलदोड्याची पूड चवीनुसार
चिमूटभर मीठ
दीड ते दोन वाट्या तूप.
पिस्ता,बदाम, काजू व इतर सुका मेवा आवडीप्रमाणे आणि अर्थात ऐपतीप्रमाणे!

कृती :-
डिंक तुपात तळून फुलवून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा . त्याच तुपात बेसन भाजायला सुरुवात करावी. बेसन थोडावेळ भाजून झाल्यावर, त्यातच कणिक घालून एकत्र खरपूस भाजून घ्यावे . चांगले भाजून झाल्यावर त्यात मीठ, वेलदोड्याची पूड, गूळ व आधी भाजून ठेवलेला डिंक, घालावा व  गॅस लगेच बंद करवा. हे मिश्रण गरम असतानाच चांगले घोटून घ्यावे व तूप लावलेल्या थाळीमध्ये वड्या थापून घ्याव्यात. वड्या थापत असतानाच  वर  काजू-पिस्ता, बदाम व इतर सुका मेवा थापावा. या वड्या शक्यतोवर जाड  ठेवाव्यात.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पनीर-मटार बेक्ड करंजी

चमचमीत चकली!

डाळ मेथ्याची उसळ