पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पनीर-मटार बेक्ड करंजी

इमेज
पनीर-मटार बेक्ड करंजी. सारणासाठी साहित्य:- १. सोललेले मटार:- अर्धा किलो २. कांदा:- एक मोठा बारीक चिरून ३. वाटलेले आले-लसूण:- १ चमचा ४.हिरव्या मिरच्या:- चार बारकी चिरून ५. गरम मसाला:- १ चमचा ६.कोथिंबीर:-१ वाटीभर बारीक चिरून ७. १ लिंबाचा रस ८. पनीर १०० ग्रॅम(कमी जास्त चालते)   ९. मीठ-साखर चवीनुसार १०. फोडणीसाठी तेल, हळद, जिरे पारीचे साहित्य:- १.मैदा पाव किलो २.मीठ चवीनुसार ३.ओवा:-१/२ चमचा ४.तेल अर्धा वाटी.  ५.बेकिंग पावडर:- १/२ चमचा.   कृती:- १.कढईत चमचाभर तेलाची फोडणी करून त्यामधे, आले-लसूण-मिरची वाटण घालावे. त्यात चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर मटारदाणे घालून, झाकण ठेवून ते अर्धवट शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यात, चवीनुसार मीठ, साखर, गरम मसाला, लिंबाचा रस, किसलेले पनीर व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.  २.मैद्यामधे मीठ, अर्धवट कुटलेला ओवा, तेल, बेकिंग पावडर घालून मिसळून घ्यावा. मैद्यामधे पाणी घालून तो खूप घट्ट भिजवून घ्यावा. अर्ध्या तासाने तो चांगला कुटून मळून घ्यावा.  ३. मैद्याची पारी लाटून त्यात मटाराचे सारण भरून करंज्या तयार करून घ्याव्यात.  ४.भरलेल्या करंज्या ट्रेमधे ठेवून त

खंबायती हलवासन

इमेज
माझी मोठी मावशी,  सौ उषा मावशी बडोद्याला राहायची.  आमच्या लहानपणी , ती सोलापूरला येताना आमच्यासाठी खास खाऊ म्हणून खंबायतचे हलवसन आणायची. आम्हला ते फारच आवडायचे. ही मिठाई खूपच खमंग लागते आणि करायला अगदीच सोपी असते.  साहित्य:- १. म्हशीचे साय न काढलेले दूध:- अर्धा लिटर २. साजूक तूप:- तीन-चार चमचे ३. बारीक केलेला डिंक:- २ चमचे ४. भरड कणीक:- २ चमचे ५.दही:- एक चमचा ६. साखर:- अर्धा ते पाऊण वाटी ७. जायफळ आणि वेलदोडापूड:-चमचाभर ८. बदाम-पिस्ता काप कृती:- डिंकाचे मोठे खडे बारीक करून घ्यावेत. पण अगदी बारीक पूड करू नये. एका कढईत दोन चमचे तूप गरम करावे. त्यात चमचाभर डिंक फुलवून घ्यावा. डिंक तळून बाजूला काढून ठेवावा.  त्यानंतर त्याच पॅनमधे अजून चमचाभर तूप घालून त्यात चमचाभर कणीक लालसर भाजून घ्यावी. कणिक जाडसर असल्यास उत्तम. नसल्यास एक चमचा कणिक आणि एक चमचा रवाही घेता येतो. कणीक भाजून झाल्यावर, त्याच कढईत दूध घालून उकळायला ठेवावे. त्यात फुलवलेला डिंक व एक चमचा दही घालावे. हे मिश्रण सतत हालवत ठेवावे. दुसऱ्या एका पॅनखाली गॅस लावून साखर गरम करायला ठेवावी. थोड्या वेळात त्याचे कॅरॅमेल होते. ते कॅरॅमेल, दुध

जिंजर बिस्किटे

इमेज
साहित्य :- १. कणीक/मैदा - ३०० ग्रॅम २. पिठी साखर :-१५० ग्रॅम्स ३. लोणी:-१५० ग्रॅम्स ४. सुंठ:- चहाचे दोन चमचे ५. बेकिंग ंपावडर-१ चमचा ६.मीठ :- पाव चमचा कृती:- १.लोणी व साखर फेटून घ्यावे २. फेटलेल्या मिश्रणात कणीक, बेकिंग पावडर, मीठ व सुंठ घालून सर्व एकत्र मळून घ्या.  ३.गोळा एकत्र होण्यासाठी आवश्यक तेव्हडे, पण कमीतकमी दूध घालून गोळा घट्ट मळून घ्या.  ४.या गोळ्याची जाडसर पोळी लाटून त्यावर काट्याने टोचून घ्या.  ५.आपल्याला हव्या त्या आकारात बिस्किटे कापून, ओव्हनमधे २००° फॅरनहाइटवर दहा-बारा मिनिटे भाजून घ्या

मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे)

इमेज
  मिश्र पिठाचा बेक्ड खाकरा (पुऱ्या/बिस्किटे)  साहि त्य:- १. गव्हाचे पीठ १०० ग्रॅम्स २. ज्वारीचे पीठ १०० ग्रॅम्स ३. बेसन १०० ग्रॅमस् ४. कांदा १ ५.कोथिंबीर मूठभर ६. लसूणपाकळ्या ४-६ ७. हिरव्या मिरच्या - ४-५ ८.ओवा१ चमचा ९. जिरे १ चमचा १०. मीठ चवीनुसार ११. तेल ३० ग्रॅम्स १२. तीळ मूठभर १३. बेकिंग पावडर १ चमचा कृती:- १. कांदा, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, मीठ, जिरे, ओवा हे सगळे पदार्थ मिक्सर मधून बारीक करून घेतले.  २. गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन, मीठ आणि तेल एकत्र केले. त्यात वरील वाटलेला मसाला व बेकिंग पावडर घातली. अगदी थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला. ३. पोलपाटावर तीळ घालून त्यावर या गोळ्याची जाडसर पोळी लाटून, एका बाटलीच्या झाकणाने सारख्या आकाराच्या पुऱ्या कापून घेतल्या. ४. प्रिहिटेड ओव्हन मधे (१८०° फॅरनहाइटवर) १०-१२ मिनिटे बेक केली. तळटीप मसाले आपल्याला हवे ते आणि हव्या त्या प्रमाणात कमी-जास्त घालता येतात. बाहेरच्या खाकऱ्यामधे फार जास्त तेल/तूप असते.

ओट्स आणि आमंड्स् कुकीज

इमेज
ओट्स आणि आमंड्स् कुकीज साहित्य:- १. ओट्स १५० ग्रॅम्स २. गव्हाचे पीठ ५० ग्रॅम्स ३. साजूक तूप :- २ चमचे ४. साखर:- १२५ ग्रॅम (कमी गोड हव्या असतील तर १०० ग्रॅम) ५. लोणी:- १०० ग्रॅम ६. बदाम - ३० ते ४० ग्रॅम (आवडीनुसार ५०-६० ग्रॅम्स पर्यंत घालू शकतो)  ७. दूध:- पाव ते अर्धा वाटी. ८. बेकिंग पावडर - १ चमचा ९. आवडीप्रमाणे वेलदोडा, जायफळ, दालचिनी, लवंग, केशर १०. मीठ पाव चमचा कृती १. प्रथम १८०° फॅरनहाइटला ओव्हन गरम करायला ठेवावा.  २. एका पॅनमधे दोन चमचे तूप गरम करून त्यावर ओट्स थोडे परतून घ्यावेत. ३. एका मोठ्या तसराळ्यात किंवा परातीत लोणी व साखर एकत्र करून घ्यावे. त्यामधे कणीक, ओट्स, मीठ, बेकिंग पावडर, जायफळ/वेलदोडा/लवंग/दालचिनी यापैकी आवडीनुसार दोन-तीन पुडी घालाव्यात. त्यातच बदामाचे काप किंवा जाडसर पूड घालून मिश्रण एकत्र करावे. हे मिश्रण मिळून येण्यासाठी लागेल तसे थोडे दूध घालून पीठ मळून घ्यावे.  ४. तयार झालेल्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून, तळहातावर दाबून कुकीज ना आकार द्यावा.  ५.  गरम ओव्हनमधे १८०° फॅरनहाइटवर कुकीज १२-१५ मिनिटे भाजून घ्याव्यात.

घेवर

इमेज
आम्ही नुकतेच जयपूरला लग्नासाठी गेलो होतो. तिथले घेवर प्रसिद्ध असल्याने तिथे घेवर खायची इच्छा होती.पण तिथे होळीनंतर १५ दिवसांनी साजरा होत असलेल्या, आपल्या चित्रगौरीसारखाच 'गणगौर' या सणाच्या निमित्ताने घेवर बनणे सुरू करतात, असे कळले.त्यामुळे जयपूरमधे कुठेही ताजे घेवर मिळाले नाहीत. म्हणून आज घरीच, शुद्ध तुपातले घेवर केले! साहित्य १ तूप :- पाव वाटी (मोहन)  २. दूध:- अर्धा वाटी ३. मैदा :- एक वाटी ४. लिंबाचा रस:- अर्धा चमचा ५. बर्फाचे पाच-सहा खडे ६. तूप:- तळणीसाठी ७.साखर एक वाटी.  ८.बदाम काप कृती १.मोहन म्हणून घेतलेले तूप आणि बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून फिरवावेत .  २. तूप खूप फेटले गेल्यावर पांढरे होते. मग त्यामध्ये  दूध आणि लिंबाचा रस घालावा आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवावे.  ३ . त्यानंतर मैदा व गर पाणी (अंदाजे एक कप) घालून पातळसर पीठ करून घ्यावे घेतले.  ४. कढईत तळणीसाठी तूप चांगले तापवावे. त्यात पळीने थोडे थोडे करत वरील मिश्रण घालून घेवर तयार करून घ्यावेत.  ५. लालसर रंगावर घेवर तळून झाल्यावर , हलक्या हाताने घेवर बाहेर काढून घेऊन त्यातील तूप निथळायला ठेवावे.  ६. साखरेचा एकतारी पाक करून

नाचणीची बिस्किटे

इमेज
साहित्य १. नाचणीचे पीठ १ कप २. साजूक तूप १/२ कप ३. पिठी साखर १/२ कप किंवा चिरलेला गूळ १/२ कपाला जरा कमी ४.बेकिंग पावडर - १ चमचा ४. मीठ, वेलची, जायफळ आणि  दालचिनी पूड प्रत्येकी पाव चमचा. ५. दूध- चार ते पाच चमचे. कृती  वर दिलेले सगळे पदार्थ एकत्र केले. पीठ एकत्र मळून येण्यासाठी अगदी आवश्यक तितके दूध घातले. प्रिहिटेड ओव्हनमधे १८० डिग्री सेंटिग्रेडला २० मिनिटे भाजून घेतली. उत्तम झाली होती.  मी नाचणीचे पीठ चाळून घेत नाही कारण कोंडा निघून जातो. या बिस्कीटामधे तूप थोडे कमी चालते. म्हणजे१/२ कपा ऐवजी १/३ कप घालता येते. तूप कमी घातल्यास पीठ मळून एकत्र येण्यासाठी दूध जरा जास्त लागते. गूळ घालून केलेली बिस्किटे जास्त खमंग लागतात.