पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मटणाचा तांबडा रस्सा

इमेज
सोलापूरच्या सौ. शालिनी चितारी काकूंच्या डब्यातला अजून एक चविष्ट पदार्थ म्हणजे, 'मटणाचा तांबडा रस्सा'! गेली कमीतकमी पन्नास वर्षे, अनेक रविवारी, आम्ही काकूंच्या हातच्या मटण चॉप्स आणि मटणाचा रस्सा असलेल्या डब्याचा आस्वाद घेत आहोत. मुरलीधर चितारी काका, दुपारी एक-दीडच्या सुमारास आम्हाला चार पुडी डबा आणून द्यायचे. आषाढातल्या रविवारी तर आमच्यासाठी खास डबा घेऊन यायचेच.  त्या डब्याला दृष्ट लागू नये म्हणून नेहमीच त्यात  कोळशाच्या एक तुकडा ठेवलेला असायचा. खरोखरच दृष्ट लागण्यासारखे लाजबाब पदार्थ त्यात असायचे. एका डब्यात मटण चॉप्स, एका डब्यात 'मटणाचा तांबडा रस्सा' आणि दोन डब्यांत त्याच्याकडचा खास मसाल्याचा हलका वास असलेला मऊ, मोकळा भात!  आता काकूंचे वय झाले असले तरीही अजूनही त्या उत्साही आहेत. काकूंची सून सौ राजेश्री चितारी, त्यांचा वारसा चालवत आहे. राजेश्रीनेच मला काकूंच्या मटण ग्रीन चॉप्सची आणि मटणाच्या तांबडा रस्स्याची कृती लिहून पाठवली आहे.  तुम्हीही या पदार्थाचा आस्वाद घ्या.   साहित्य :- १. मटण :- १ किलो  २. कांदे:- ६ ते ७ ३. सुके खोबरे कीस :- १ वाटी  ४. लसूण पाकळ्या:- २० ५.  आ

मटण ग्रीन चॉप्स

इमेज
आजपर्यंत मी खाल्लेल्या मटण चॉप्स पैकी सगळ्यात उत्तम चॉप्स हे सोलापूरच्या सौ शालिनी चितारी काकूंच्या हातचे आहेत. काकूंचे सगळेच खाद्यपदार्थ उत्तम होतात. पण मटण चॉप्स आणि मटणाचा तांबडा रस्सा त्या विशेष चांगला करतात.   काकूंचे माहेर पुण्यातल्या कॅम्प भागात राहणाऱ्या नरलांकडचे. हे पदार्थ करायला त्या त्यांच्या आईकडून शिकल्या , असे काकू सांगतात.  गेली अनेक वर्षे काकू आम्हाला अगदी प्रेमाने हे पदार्थ खायला घालत आहेत.  तुम्हीही काकूंच्या प्रमाणाने हे मटण चॉप्स करून बघा! साहित्य :- १. मटन चॉप्स:- १ किलो  २. ओला नारळ:- १ मोठा  ३. कोथिंबीर:- अर्धा वाटी  ४. हिरव्या मिरच्या :-१० ते १२ ५. आले :- ३ इंच  ६. लसूण पाकळ्या :-१५ ते २० .  ७. काजू बदाम पेस्ट:- सात-आठ काजू व बदामाची पेस्ट   ८ गरम मसाला :- मिरे -१०, लवंग-४, वेलदोडे-७ ते ८, दालचिनी तुकडे-७ ते ८  ९. तेल:- तीन मोठे चमचे  १०. मीठ:- चवीनुसार  ११. हळद:-पाव चमचा   कृती :- ओला नारळ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची असे हिरवे वाटण करून घ्यावे. आले आणि लसूण एकत्र वाटून घ्यावे. काजू आणि बदामाचे वाटण करून घ्यावे. गरम मसाल्याची पूड करून घ्यावी.  प्रथम चॉप्स स्वच्छ

वेगळ्या रूपातील, ताकातली सांडगी मिरची

इमेज
आमच्या साहवर्धन समूहाच्या सदस्य असलेल्या सौ मेदिनी अभ्यंकर यांनी वेगळ्या रूपातील सांडगी मिरची केली. सहज प्रयोग म्हणून त्यांनी सांडगी मिरच्यांच्या उरलेल्या मसाल्यात, फूड प्रोसेसेरमधून बारीक करून घेतलेल्या मिरच्या घातल्या. त्यानंतर ते मिश्रण  कडकडीत उन्हात वाळवले. तो प्रयोग यशस्वी झाला.  बरेचदा आपण अख्खी सांडगी मिरची, एखाद्या पदार्थात घातली की अनेक लोक ती मिरची बाहेर काढून टाकतात आणि फक्त आतला मसाला  खातात. त्यामुळे मिरची वाया जाते.  यावर,  मेदिनीताईंनी काढलेला, मिरच्या चुरून वापरण्याचा, हा उपाय मला फारच चांगला वाटला . या मिरच्यांची कृती वाचून माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि मी त्यांची परवानगी घेऊन इथे लिहली.  मेदिनीताईंची आणि माझी अजून प्रत्यक्ष भेट झालेली नाही पण आमची मैत्री अशा या खमंग पदार्थाच्या निमित्ताने झाली हे विशेष! साहित्य;- १.  धने -१०० ग्रॅम  २. मेथ्या किंवा मेथी दाणे- १०० ग्रॅम  ३. मीठ -३ चमचे  ४. हळद-२ चमचे  ५. हिंग पूड- १ चमचा  ६. आंबट ताक- दीड वाटी  ७. तिखट हिरव्या मिरच्या-२५० ग्रॅम  कृती- मेथी दाणे आणि धन्याची मिक्सरमधून रवाळ पूड करून घेतली. मिरची सोडून इतर पदार्थ एकत्र क

आईची कणकेची बिस्किटे

इमेज
हे प्रमाण माझ्या आईचे आहे का आजीचे आहे हे सांगणे अवघड आहे. आमच्या घरी एक अगदी जुने पत्र्याचे बिस्कीटपात्र  होते. त्यात आई-आजी कणकेची बिस्किटे करताना मी पाहिलेले आहे. त्या बिस्कीटपत्रातल्या कप्प्याच्या खाली- वर निखारे ठेऊन भाजलेल्या बिस्किटांना एक धुरकट, खमंग वास असायचा. आमच्या घरी बिस्किटे कापण्यासाठी एक साचा होता. आईच्या हाताखाली लुडबुड करत, बिस्किटे कापायला मदत करायला मजा यायची. नंतर आम्ही मुले मोठी झालो आणि घरांत एकाचवेळी, वाढत्या वयाची सात भावंडे झाल्यावर मात्र, आई-काकू, दिवेकर बेकरीत  सर्व सामान देऊन, तिथून बिस्किटे भाजून आणायच्या. ही बिस्किटे खूपच हलकी होतात आणि दुधात किंवा चहांत बुडवली की  छान मऊ होतात, पण विरघळत नाहीत. आता तो माझ्या माहेरच्या घरातील बिस्किटाचा साचा माझ्याकडे नाही नाही. त्यामुळे इंटरनेटवरचा फोटो टाकला आहे.    साहित्य  १.  कणीक १ किलो  २. पिठीसाखर  १/२ किलो (मी मोरसही घेते.) ३. पांढरे लोणी १/४ किलो  ४. खाण्याचा सोडा २चमचे  ५. अमोनिया ५चमचे ६.  मीठ १/२चमचा ७ दूध १/२ ते ३/४ कप  कृती   दुधाव्यतिरिक्त सगळे पदार्थ एकत्र करायचे. कणीक घट्टसर मळण्यासाठी लागेल तेवढे दूध घ

तीळगुळाचा केक!

इमेज
काल संक्रात असूनही तीळ आणि गूळाचे काहीच केले नाही. म्हणून आज तीळ आणि गूळ वापरून केक केला. साहित्य :- १.लोणी २०० ग्रॅम २.गूळ २०० ग्रॅम ३. नाचणीचे पीठ २०० ग्रॅम ४.दूध १/२ कप (१०० मिली) ५. तीळ २५ ग्रॅम (अंदाजे)  ६.बेकिंग पावडर - १ चमचा(५ ग्रॅम) ७.चिमूटभर मीठ ८.जायफळाची पूड १/२ चमचा कृती;- लोणी, गूळ आणि दूध एकत्र करून फेटून घेतले.  त्यात हळूहळू  नाचणीचे पीठ, तीळ,बेकिंग पावडर, मीठ व जायफळाची पूड घालून पीठ एकत्र केले. हे करत असताना एकीकडे कुकर गॅसवर ठेऊन गरम करून घेतला होता.  एका कुकरच्या डब्याला आतून तूप लावून घेतले. त्यावर नाचणीचे पीठ भुरभुरले . केकचे तयार केलेले मिश्रण या डब्यात ओतले.   गरम कुकरमधे तो डबा ठेवून, साधारण ५०-५५ मिनिटे केक भाजून घेतला.