माझ्या आठवणीत, मासळीचा सगळ्यात चवदार रस्सा, १९८६ सालच्या डिसेंबर महिन्यांतली आहे. आमच्या लग्नानंतर ,मी आणि आनंद गोव्याला गेलो होतो. आनंदचे धाकटे मामा, बाबूमामा जोशी त्यावेळी गोव्यात राहत होते. बाबूमामांची बायको, म्हणजे आमच्या अलका मामी, माहेरच्या तेंडुलकर, म्हणजे कुडाळ देशकर आद्य गौड सारस्वत ब्राम्हण आहेत. मामींनी आम्हाला त्यांच्या माहेरच्या पद्धतीची माशाची आमटी खायला घातली होती. त्याची चव मी कधीही विसरणार नाही. अलका मामींना विचारून त्यांची ती पाककृती आज माझ्या ब्लॉगवर टाकते आहे. साहित्य:- मासे:- बांगडा, पापलेट, सारंग, इसवण, यापैकी एखाद्या प्रकारच्या माशाचे पाच-सहा माध्यम आकाराचे तुकडे मीठ- चवीनुसार १ मोठ्ठ्या ओल्या नारळाचे खवलेले खोबरे (दोन वाट्या भरून खोबरे) चिंच कोळासाठी- दोन चमचे कोळ धने-एक ते दीड चमचा १ कांदा- बारीक चिरून लाल तिखट- १ चमचा भरून मिरे;- ५ ते ६ लाल तिखट हळद- अर्धा चमचा तांदुळाची पिठी- अर्धा चमचा साजूक तूप/खोबऱ्याचे तेल- एक चमचा कृती:- माशाच्या तुकड्यांना, चमचाभर मीठ लावून ठेवावे. १५-२० मिनिटानंतर ते तुकडे एक दोन वेळा, स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावेत. य