पोस्ट्स

अनसुयाबाईंचा मसालेभात

सोलापूरला माझ्या माहेरी, अनसुयाबाईं चितापूरकर नावाच्या एक बाई सणावाराला स्वयंपाक करायला यायच्या. त्यांच्या हातचे बरेच पदार्थ उत्कृष्ट असत. त्यांचा नवरा आचारी होता. त्यामुळे  इतरवेळी त्या लग्नाचा स्वयंपाक करायच्या. त्यांच्या हातचा मसालेभात अगदी खास असायचा.  अनसुयाबाईंचे मसालेभाताचा प्रमाण:-.  साहित्य - धने :- १ वाटी साधे जिरे:-१/४ वाटी दालचिनी:- ५-६ काड्या लवंगा:-१०-१२ शहाजिरे:-१ चमचा कृति:- धने कोरडे, हलके भाजून घ्यावेत. धने भाजून होत आले की त्यात साधे जिरे घालून अगदी थोडावेळ धने-जिरे एकत्र भाजावेत. त्यानंतर गॅस बंद करून त्यात लवंगा, शहाजिरे व दालचिनी घालून, सगळे मिश्रण थंड करावे.  थंड झालेले मसाल्याची बारीक पूड करून घ्यावी.  १ वाटी तांदूळासाठी वरील मसाला २ चहाचे चमचे भरून घालावा.  तांदूळ धुवून फडक्यावर निथळून ठेवावेत. तेलाची फोडणी करून त्यात तमालपत्र, आवडीप्रमाणे हिरवी/लाल मिरची घालावे. निथळलेला तांदूळ फोडणीमधे चांगला परतून घ्यावा. तांदळाच्या दुप्पट आधण घालून, त्यात मीठ, तयार केलेला मसाला घालून, झाकण ठेवून भात वाफवून घ्यावा.  मसालेभात वाढताना त्यावर भ...

गुजिया

इमेज
साहित्य:-  पारीसाठी:- मैदा  १ कप तूप पाव  वाटी मीठ चिमूटभर पाणी सारणासाठी:- खवा पाव किलो रवा पाववाटी  पिठी साखर दीड वाटी सुळे खोबरे कीस १ वाटी खसखस चार चहाचेर चमचे बडीशोप १ चहाचा चमचा बदाम काप पाव वाटी वेलदोड्याची पुड १ चमचा कृती :- पारी:- मैद्याला तूप लावून घ्यावे. साधारण मूठ वळेल इतपत तूप घालावे. मैद्यात चिमूटभर मीठही घालावे. पाणी घालून मैदा घट्ट भिजवून ठेवावा. सारण:- खसखस व बडिशोप भाजून घेऊन पूड करून घ्यावी. खवा हलका परतून घ्यावा बदामाचे काप तुपावर परतून घ्यावेत रवा तुपावर भाजून खाव्यावर घालून ठेवावा त्यात साखर, सुके खोबरे, खसखस व बडिशोपेची पूड, वेलदोड्याची पूड घालून एकत्र करावे. मैद्याची जाडसर पारी वाटून त्यात सारण भरावे.  गुजियांना मुरड घालून बंद कराव्यात. मंद आचेवर तेलामधे तळून घ्याव्यात. 

गोळ्याचे सांबर

इमेज
चण्याच्या डाळीचे किंवा बेसनाचे अनेक पदार्थ आपण घरी करतो. परवा सहज बोलता बोलता माझ्या वडिलांना गोळ्याच्या सांबाराची आठवण झाली.  त्यानंतर त्यांनी त्यांच्या लहानपणीची आठवण मला सांगितली.   त्यांच्या लहानपणी, त्यांच्या घरामधे स्वयंपाकाला येणाऱ्या गंगुबाई नावाच्या  स्वयंपाकीण बाईंचे माझे वडील विशेष लाडके होते म्हणे. गंगुबाईंनी गोळ्याचे सांबर केले की त्या खास माझ्या वडिलांसाठी, सांबारात एकच गोळा मोठय़ा आकाराचा करायच्या आणि वडिलांना अगदी प्रेमाने तो वाढायच्या. लहानपणी इतक्या छोट्या गोष्टीचेही किती अप्रूप असते नाही? वडिलांनी आज त्यांच्या वयाच्या नव्वदीतही ती खास आठवण मनांत कुठेतरी जपून ठेवलेली आहे.  बरेच दिवसांत मी गोळ्याचे सांबर केले नव्हतेच. वडिलांनी आठवण करून दिली म्हणून मीही गोळ्याचे सांबर करायचे ठरवले. माझ्या आजीने सांगितलेली आणि मी उतरवून घेतलेली ही  पाककृती आज लिहून काढली. साहित्य:-  गोळ्यांसाठी- चण्याच्या डाळीचा भरडा -१ वाटी   चण्याच्या डाळीचे पीठ- १/२ वाटी   मीठ- अंदाजाने, चवीपुरते  हिंग- अंदाजाने, चिमूट...

शेपूची फळं!

इमेज
सोलापूरच्या माझ्या बाल मैत्रिणीने , डॉक्टर सुनीता सुर्डी (पूर्वसर्मीची नान्नजकर) हिने संगितलेला, करायला अगदी सोपा, रुचकर आणि आरोग्यदायी असा,  'शेपूची फळे'  हा  पदार्थ, मी आज करून बघितला. त्याची पाककृती आज सांगते.  साहित्य:- ज्वारीचे पीठ  मीठ  लसूण  शेपूची पेंडी फोडणीसाठीचे साहित्य   कृती  ज्वारीच्या पिठात मीठ व थोडा लसूण कांडून घालावा. पीठ घट्ट मळून घेऊन त्याचे छोटे गोल व चपटे गोळे बनवून घ्यावे. शेपू स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. चाळणीला तेल लावून त्यावर १ थर गोळे ठेवून त्यावर शेपूचा थर घालावा. हि चलनी उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ठेऊन या गोळ्यांना चांगली दणदणून वाफ काढून घ्यावी. नंतर थोडी फोडणी घालून तसेच खावे किंवा परतून घेतले तरी चालते. शेपूच्या ऐवजी इतरही पालेभाज्या घालता येतात. आज मी मेथी घालून फळे केली होती. सुनीताने सांगितल्याप्रमाणे फोडणीत मोहरी, हिंग, हळद अशी फोडणी केलीच होती. पण त्या फोडणीत थोडेसे तीळ घातल्यामुळे अजूनच चवदार लागली.    डायटींग वगैरेचा विचार न करता, लोखंडी तव्यावर...

पनीर-मटार बेक्ड करंजी

इमेज
पनीर-मटार बेक्ड करंजी. सारणासाठी साहित्य:- १. सोललेले मटार:- अर्धा किलो २. कांदा:- एक मोठा बारीक चिरून ३. वाटलेले आले-लसूण:- १ चमचा ४.हिरव्या मिरच्या:- चार बारकी चिरून ५. गरम मसाला:- १ चमचा ६.कोथिंबीर:-१ वाटीभर बारीक चिरून ७. १ लिंबाचा रस ८. पनीर १०० ग्रॅम(कमी जास्त चालते)   ९. मीठ-साखर चवीनुसार १०. फोडणीसाठी तेल, हळद, जिरे पारीचे साहित्य:- १.मैदा पाव किलो २.मीठ चवीनुसार ३.ओवा:-१/२ चमचा ४.तेल अर्धा वाटी.  ५.बेकिंग पावडर:- १/२ चमचा.   कृती:- १.कढईत चमचाभर तेलाची फोडणी करून त्यामधे, आले-लसूण-मिरची वाटण घालावे. त्यात चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर मटारदाणे घालून, झाकण ठेवून ते अर्धवट शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यात, चवीनुसार मीठ, साखर, गरम मसाला, लिंबाचा रस, किसलेले पनीर व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.  २.मैद्यामधे मीठ, अर्धवट कुटलेला ओवा, तेल, बेकिंग पावडर घालून मिसळून घ्यावा. मैद्यामधे पाणी घालून तो खूप घट्ट भिजवून घ्यावा. अर्ध्या तासाने तो चांगला कुटून मळून घ्यावा.  ३. मैद्याची पारी लाटून त्यात मटाराचे सारण भरून करंज्या तयार करून घ्याव्यात.  ४.भरल...

खंबायती हलवासन

इमेज
माझी मोठी मावशी,  सौ उषा मावशी बडोद्याला राहायची.  आमच्या लहानपणी , ती सोलापूरला येताना आमच्यासाठी खास खाऊ म्हणून खंबायतचे हलवसन आणायची. आम्हला ते फारच आवडायचे. ही मिठाई खूपच खमंग लागते आणि करायला अगदीच सोपी असते.  साहित्य:- १. म्हशीचे साय न काढलेले दूध:- अर्धा लिटर २. साजूक तूप:- तीन-चार चमचे ३. बारीक केलेला डिंक:- २ चमचे ४. भरड कणीक:- २ चमचे ५.दही:- एक चमचा ६. साखर:- अर्धा ते पाऊण वाटी ७. जायफळ आणि वेलदोडापूड:-चमचाभर ८. बदाम-पिस्ता काप कृती:- डिंकाचे मोठे खडे बारीक करून घ्यावेत. पण अगदी बारीक पूड करू नये. एका कढईत दोन चमचे तूप गरम करावे. त्यात चमचाभर डिंक फुलवून घ्यावा. डिंक तळून बाजूला काढून ठेवावा.  त्यानंतर त्याच पॅनमधे अजून चमचाभर तूप घालून त्यात चमचाभर कणीक लालसर भाजून घ्यावी. कणिक जाडसर असल्यास उत्तम. नसल्यास एक चमचा कणिक आणि एक चमचा रवाही घेता येतो. कणीक भाजून झाल्यावर, त्याच कढईत दूध घालून उकळायला ठेवावे. त्यात फुलवलेला डिंक व एक चमचा दही घालावे. हे मिश्रण सतत हालवत ठेवावे. दुसऱ्या एका पॅनखाली गॅस लावून साखर गरम करायला ठेवावी. थोड्या वेळात त्याचे कॅरॅमेल हो...

जिंजर बिस्किटे

इमेज
साहित्य :- १. कणीक/मैदा - ३०० ग्रॅम २. पिठी साखर :-१५० ग्रॅम्स ३. लोणी:-१५० ग्रॅम्स ४. सुंठ:- चहाचे दोन चमचे ५. बेकिंग ंपावडर-१ चमचा ६.मीठ :- पाव चमचा कृती:- १.लोणी व साखर फेटून घ्यावे २. फेटलेल्या मिश्रणात कणीक, बेकिंग पावडर, मीठ व सुंठ घालून सर्व एकत्र मळून घ्या.  ३.गोळा एकत्र होण्यासाठी आवश्यक तेव्हडे, पण कमीतकमी दूध घालून गोळा घट्ट मळून घ्या.  ४.या गोळ्याची जाडसर पोळी लाटून त्यावर काट्याने टोचून घ्या.  ५.आपल्याला हव्या त्या आकारात बिस्किटे कापून, ओव्हनमधे २००° फॅरनहाइटवर दहा-बारा मिनिटे भाजून घ्या