मटणाचा तांबडा रस्सा
सोलापूरच्या सौ. शालिनी चितारी काकूंच्या डब्यातला अजून एक चविष्ट पदार्थ म्हणजे, 'मटणाचा तांबडा रस्सा'! गेली कमीतकमी पन्नास वर्षे, अनेक रविवारी, आम्ही काकूंच्या हातच्या मटण चॉप्स आणि मटणाचा रस्सा असलेल्या डब्याचा आस्वाद घेत आहोत. मुरलीधर चितारी काका, दुपारी एक-दीडच्या सुमारास आम्हाला चार पुडी डबा आणून द्यायचे. आषाढातल्या रविवारी तर आमच्यासाठी खास डबा घेऊन यायचेच. त्या डब्याला दृष्ट लागू नये म्हणून नेहमीच त्यात कोळशाच्या एक तुकडा ठेवलेला असायचा. खरोखरच दृष्ट लागण्यासारखे लाजबाब पदार्थ त्यात असायचे. एका डब्यात मटण चॉप्स, एका डब्यात 'मटणाचा तांबडा रस्सा' आणि दोन डब्यांत त्याच्याकडचा खास मसाल्याचा हलका वास असलेला मऊ, मोकळा भात! आता काकूंचे वय झाले असले तरीही अजूनही त्या उत्साही आहेत. काकूंची सून सौ राजेश्री चितारी, त्यांचा वारसा चालवत आहे. राजेश्रीनेच मला काकूंच्या मटण ग्रीन चॉप्सची आणि मटणाच्या तांबडा रस्स्याची कृती लिहून पाठवली आहे. तुम्हीही या पदार्थाचा आस्वाद घ्या. साहित्य :- १. मटण :- १ किलो २. कांदे:- ६ ते ७ ३. सुके खोबरे कीस :- १ वाटी ४. लसूण पाकळ्या:- २० ५. आ