ग्रीक योगर्ट क्रॅकर्स!
साहित्य:- १. मैदा १०० ग्रॅम २. चक्का:- १०० ग्रॅम ३. मीठ चवीनुसार ४. मसाले:- जिरे, ओवा, काळीमिरी, इटालियन हर्बस्, रोजमेरी, कलौंजी,लसूणपूड,लाल/हिरवी मिरची... आवडीनुसार घालावेत. कृती :- १. मैदा व चक्का, चवीपुरते मीठ व आवडीनुसार मसाले एकत्र करून मळून घ्यावे. पीठाचा गोळा घट्ट असला पाहिजे. त्यासाठी मैदा व चक्क्याचे प्रमाण कमी जास्त करून घट्ट गोळा मळून घ्यावा. २. या गोळ्याच्या पातळ पोळ्या लाटून त्या पोळीला वरून जरा टोचे मारावेत. पोळीचे हव्या त्या आकाराचे तुकडे कापून घ्यावेत. ३. ओव्हन १८० डिग्री फॅरनहाइईटला पाच मिनिटे गरम करून घ्यावा. ४. गरम ओव्हनमधे क्रॅकर्स अंदाजे १० मिनिटे भाजून घ्याव्यात. ५. बाहेर काढून वर हवे ते टॉपिंग घालून खाव्यात. मी चीझ आणि चिली सॉस घालून केल्या होत्या.