तीळगुळाचा केक!
काल संक्रात असूनही तीळ आणि गूळाचे काहीच केले नाही. म्हणून आज तीळ आणि गूळ वापरून केक केला. साहित्य :- १.लोणी २०० ग्रॅम २.गूळ २०० ग्रॅम ३. नाचणीचे पीठ २०० ग्रॅम ४.दूध १/२ कप (१०० मिली) ५. तीळ २५ ग्रॅम (अंदाजे) ६.बेकिंग पावडर - १ चमचा(५ ग्रॅम) ७.चिमूटभर मीठ ८.जायफळाची पूड १/२ चमचा कृती;- लोणी, गूळ आणि दूध एकत्र करून फेटून घेतले. त्यात हळूहळू नाचणीचे पीठ, तीळ,बेकिंग पावडर, मीठ व जायफळाची पूड घालून पीठ एकत्र केले. हे करत असताना एकीकडे कुकर गॅसवर ठेऊन गरम करून घेतला होता. एका कुकरच्या डब्याला आतून तूप लावून घेतले. त्यावर नाचणीचे पीठ भुरभुरले . केकचे तयार केलेले मिश्रण या डब्यात ओतले. गरम कुकरमधे तो डबा ठेवून, साधारण ५०-५५ मिनिटे केक भाजून घेतला.