पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोलापुरी शेंगा-पोळया

इमेज
एक किलो शेंगदाणे  तीन पाव गूळ  अर्धा ते एक छटाक सुंठ  अर्धा ते एक छटाक वेलदोडे  एक छटाक बडीशोप  शेंगदाणे भाजून घ्यावेत व त्यांच  साले काढून घ्यावीत . शेंगदाणे व गूूळ एकत्र करून ते मिक्सरला वाटून घ्यावेत. नंतर त्यात सुंठ, वेलदोडा आणि बडिशोपेची पूड करून घालावी.  गव्हची कणिक सध्या पोळ्याच्या कणकेसारखीच भिजवून घ्यावी. कणकेच्या पारीच्या आकाराचा सारणाचा उंडा घेऊन, तो भरून पोळी जरा जाडसर लाटावी. गरम तव्यावर तूप सोडून पोळ्या भाजून घ्याव्यात. या पोळ्या सोलापुरात संक्रांतीच्या वेळी करतात. घट्ट साजूक तुपाबरोबर खायला मजा येते.  पुण्यात माझ्या घरी, काही वर्षांपूर्वी, रूपाली नावाची एक सोलापूरकर मोलकरीण कामाला होती. तिच्या कडून मी या पोळ्या करायला शिकले.