शेपूची फळं!
सोलापूरच्या माझ्या बाल मैत्रिणीने , डॉक्टर सुनीता सुर्डी (पूर्वसर्मीची नान्नजकर) हिने संगितलेला, करायला अगदी सोपा, रुचकर आणि आरोग्यदायी असा, 'शेपूची फळे' हा पदार्थ, मी आज करून बघितला. त्याची पाककृती आज सांगते. साहित्य:- ज्वारीचे पीठ मीठ लसूण शेपूची पेंडी फोडणीसाठीचे साहित्य कृती ज्वारीच्या पिठात मीठ व थोडा लसूण कांडून घालावा. पीठ घट्ट मळून घेऊन त्याचे छोटे गोल व चपटे गोळे बनवून घ्यावे. शेपू स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. चाळणीला तेल लावून त्यावर १ थर गोळे ठेवून त्यावर शेपूचा थर घालावा. हि चलनी उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ठेऊन या गोळ्यांना चांगली दणदणून वाफ काढून घ्यावी. नंतर थोडी फोडणी घालून तसेच खावे किंवा परतून घेतले तरी चालते. शेपूच्या ऐवजी इतरही पालेभाज्या घालता येतात. आज मी मेथी घालून फळे केली होती. सुनीताने सांगितल्याप्रमाणे फोडणीत मोहरी, हिंग, हळद अशी फोडणी केलीच होती. पण त्या फोडणीत थोडेसे तीळ घातल्यामुळे अजूनच चवदार लागली. डायटींग वगैरेचा विचार न करता, लोखंडी तव्यावर भरपूर तेलाची चमचमीत फोडणी करून, त्यावर ही वाफवलेली फळे घालून खाल्लीत तर अजूनच मजा ये